जीवापाड प्रेम करून संसार थाटला! 3 महिन्यांनी नराधम जागा झाला अन् विवाहितेसोबत दिवस-रात्र…; घरीच केलं धक्कादायक कृत्य | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

Mumbai Crime News : ऑफिसमध्ये प्रेम जुळलं आणि लग्न ही केलं. मात्र अवघ्या तीन महिन्यातच पती नराधम बनेल अशी कल्पनाही तिने केली नसेल.नक्की काय घडलं ते जाणून घ्या.

ऑफिसमधील ओळख लग्नापर्यंत पोहोचली, पण ३ महिन्यांतच नराधम जागा
ऑफिसमधील ओळख लग्नापर्यंत पोहोचली, पण ३ महिन्यांतच नराधम जागा

मुंबई : सर्व काही सुरळीत सुरु होतं. फक्त तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी नव्या आयुष्याची स्वप्न पाहिली होती. पण कोणालाही जराही कल्पना नव्हती की, ज्याच्यावर तिने अत्यंत जीवापाड प्रेम केलं, तोच व्यक्ती तिच्यासाठी सर्वात मोठा काळ ठरेल आणि एका रात्री…

तीन महिन्यांतच आयुष्याने घेतलं वेगळं वळण

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील घाटकोपर परिसरातील राहणाऱ्या 44 वर्षीय अनिता शिंदे यांच्या सोबत ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. जिथं तीन महिन्यापूर्वी अनिता या साकीनाका येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होत्या. नोकरी दरम्यान त्यांची ओळख ही अरुण शिंदे याच्यासोबत झाली. हळूहळू याच ओळखीचे रुपांत प्रेमातही झाले. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी 19 मार्च रोजी त्यांचे लव्हमॅरेज झाले.

दोघांनाही लग्न केलं पण हे सुखाचे दिवस जास्त काळ टिकले नाही. लग्ना झाल्यानंतरच्या काही दिवसातच अरुण अनितावर चारित्र्यावरुन संशय घेत असत आणि वारंवार त्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाले. लग्नानंतर दोघांमध्ये सुरु असलेले हे वाद अनिताच्या घरापर्यंतही पोहोचले आणि अनिताच्या माहेरच्यांनी मध्यस्ती करुन दोघांमधील वाद मिटवण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर हे पती-पत्नी घाटकोपरच्या शांतीनगर परिसरात राहण्यासाठी आले. पण नवी घरात संसाराला सुरुवात केली तरही परिस्थिती काही बदलली नाही.

अरुण हा लग्नानंतर कोणतेही काम करत नव्हता. दिवसभर मद्यपाण करुन अनिताला त्रास देयचा. दारुच्या नशेत तो पुन्हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला बेदम मारहाण करायचा. अनिताने आपल्याला होत असलेल्या या छळाबद्दल तिच्या माहेरच्या लोकांना सांगितले होते.

शेजाऱ्यांच्या संशयाने उघड झाला धक्कादायक प्रकार

अखेर 4 जुलै रोजी अनिताच्या आई एका कामासाठी तिच्या घरी गेल्या होत्या. पण अनिता कोणताही प्रतिसाद देत नसल्याले आणि ती बाहेर गेली असावी, या विचाराने आई पुन्हा त्यांच्या घरी गेल्या.मात्र काही वेळात अनिताच्या शेजाऱ्यांना घरात काहीतरी अघटित घडल्याचा संशय आला त्यामुळे त्यांनी तिच्या माहेरच्या लोकांना निरोप दिला. तातडीने तिच्या घरच्या आले आणि त्यांनी दरवाजा उघडून पाहिला असता अनिताने घरात गळफास घेतल्याचे दिसून आले.

अखेर विवाहितेचा दुर्दैवी शेवट

धक्कादायक म्हणजे पतीकडून वारंवार होणारा मानसिक छळ, मारहाण आणि चारित्र्यावरील संशयाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी मृत महिलेचा पती अरुण शिंदे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

जीवापाड प्रेम करून संसार थाटला! 3 महिन्यांनी नराधम जागा झाला अन् विवाहितेसोबत दिवस-रात्र…; घरीच केलं धक्कादायक कृत्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *