Last Updated:
Mumbai Shocking News : करी रोड येथील शेजाऱ्याच्या सतर्कतेमुळे उघड झाला 14 वर्षे काम करत असलेल्या एका विश्वासू मोलकरणीचा प्रताप. नक्की काय घडले आणि नेमका हा प्रकार कसा समोर आला, त्याबाबत सविस्तर जाणून घ्या.
मुंबई : गेल्या 14 वर्षांपासून ती त्या घरात अगदी कुटुंबातील सर्व सदस्यासारखीच वावरत होती. तिच्यावर सर्वांचा खूप विश्वास होता. मात्र शेजारी घडलेल्या एका घटनेने तिचं असं काही गुपित सगळ्यांसमोर आणलं की, विश्वासू चेहऱ्यामागचा तो खरा आणि भयानक चेहरा पाहून सर्वजण हादरुन गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील तक्रारदार महिला ही बीएमसीतून गेल्या तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेली आहे. सध्या ती करी रोड या परिसरात आपल्या पती आणि मुलासोबत वास्तव्यास आहे. या कुटुंबाकडेच योगित ही गेल्या 14 वर्षांपासून घरकाम करत होती. इतकी वर्षे जुनी असल्याने घरातील प्रत्येक सदस्यांचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. मात्र तिच्या वागण्यात बदल तक्रारदार महिलेला दिसून आला त्यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात योगिताला कामावरुन काढून टाकले होते.
याच दिवसात तक्रारदार महिलेच्या शेजारी राहत असलेल्या एका व्यक्तीच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार ही समोर आला. विशेष गोष्ट म्हणजे याच शेजाऱ्याकडेही हीच योगिता घरकाम करत होती. त्यानंतर शेजाऱ्याला तिच्यावर संशय आला त्यामुळे त्यांनी तिला थेट पोलीस ठाण्यात नेले आणि तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची धकमी ही दिली. अखेर पोलिसांच्या धाकाने योगिताने शेजाऱ्याच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली आणि चोरी केलेल सर्व दागिने हे परत केले.
शेजाऱ्याच्या घरातील चोरीचा हा प्रकार तक्रारदार महिलेला समजला, त्यानंतर तिच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली आणि तिने तातडीने आपल्या घरातील कपाटाची-लॉकरची पाहणी केली. तेव्हा तिच्या कपाटातील सोन्याचे दोन मोठे हार अशा अनेक वस्तू तब्बल 8 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गायब होते. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली आणि पोलिस पुढील तपास करत आहेत.
Mumbai,Maharashtra
Jul 07, 2026 11:11 AM IST
तब्बल 14 वर्षे चेहरा बदलून घरात राहिली; शेजारी घडलेल्या एका घटनेने अखेर तिचं भयंकर गुपित आणलं समोर; मुंबईतील खळबळजनक घटना
