मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य: ‘शहरी नक्षलवाद हे नव्या युगातील सर्वात मोठं आव्हान, तर काँग्रेस अल्ट्रा लेफ्टिस्ट विचारांनी ग्रस्त’


Cm Devendra fadanvis statement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेस आता अल्ट्रा लेफ्टिस्ट झाली आहे, असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी शहरी नक्षलवादावरही भाष्य केलं आहे.

Devendra fadanvis said congress is ultra leftist now
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर, जितेंद्र खापरे : महाराष्ट्रात नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे आणि छत्तीसगडमधूनही तो लवकरच हद्दपार होईल. मात्र आता बंदुकीच्या नक्षलवादापेक्षा अधिक घातक असा शहरी नक्षलवाद उदयास आला आहे. हा नक्षलवाद बिनचेहऱ्याचा, विचारांच्या माध्यमातून पसरवला जाणारा आणि तरुण पिढीला अराजकतेकडे नेणारा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक भेटी दरम्यान ते बोलत होते.

त्यांनी सांगितले की, “जेन झी अर्थात नव्या पिढीला दिशाभूल करून संविधान आणि संवैधानिक संस्थांवरील विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न शहरी नक्षलवादी करत आहेत. हे सरकारपुढील सर्वात मोठं चॅलेंज आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या ताकदीवर आम्ही या अराजकतावाद्यांचा निश्चित पराभव करू. बंदुकीच्या नक्षलवादात शत्रू कोण हे स्पष्ट असते, पण शहरी नक्षलवाद बिनचेहऱ्याचा आहे. हे लोक वेगवेगळ्या रूपात समाजात वावरतात आणि विषारी विचार पेरतात. त्यांच्या विरोधात लढा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.”
Maharashtra Timesअलिबागमध्ये भररस्त्यात साप आणि मुंगूस भिडले, थरारक लढाई पाहून प्रवासी स्तब्ध; काहीवेळ वाहतूक ठप्पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि खासदार राहुल गांधी यांच्यावरही यावेळी जोरदार टीका केली. “आमच्या विरोधकांमध्ये काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, परंतु आज ती पक्षसंस्था ‘अल्ट्रा लेफ्टिस्ट’ विचारसरणीने ग्रस्त झाली आहे. इंदिरा गांधींच्या काळातही असे घडले नव्हते. मात्र राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस फक्त ‘डिस्ट्रक्टिव’ म्हणजे विध्वंसक मुद्दे उचलत आहे. ते सरकारवर नव्हे तर संविधानिक संस्थांवर हल्ला करत आहेत, जे लोकशाहीसाठी अधिक घातक आहे,” असा आरोप त्यांनी केला.

“आज भारताच्या राजकारणात विरोधकांनी स्वतःचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. देशाच्या प्रगतीच्या वाटचालीत बांधणीकारक भूमिका घेण्याऐवजी विरोधक फूट पाडणारी भूमिका घेत आहेत.” असेही फडणवीस म्हणाले.

जातीय राजकारणावर भाष्य करताना त्यांनी म्हटले, “जात जनतेच्या मनात नाही, ती नेत्यांच्या मनात असते. निवडणुका आल्या की त्यांची जात बाहेर पडते. पण जनता आता जागृत आणि समजूतदार झाली आहे. म्हणूनच जनतेने नेहमीच मला पाठिंबा दिला आहे.”

सगळं लुटलं, स्वप्न उद्ध्वस्त… सराफाच्या फसवणुकीनं महिलांच्या डोळ्यात अश्रू!

मतदार याद्यांतील त्रुटींबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “मतदार याद्यांमधील घोळ हे काही आजचे प्रकरण नाही. मी 2012 पासून या संदर्भात उच्च न्यायालयात याचिकाकर्ता आहे. त्याचा अजून निकाल लागला नाही, हे ग्रामीण भागात नाही तर शहरी भागात जास्त आहे. जर दोन तीन ठिकाणी नाव असताना एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदान केले हे विरोधकांनी दाखवून द्यावे, कारण असे घडत नाही. आमच्याकडे आमचे विरोधक ज्या मतांवर निवडणून येतात, त्या घटकांच्या मतदार याद्या कशा सदोष आहेत, त्याचे पुरावे आमच्याकडे आहे. योग्यवेळी आम्ही त्या याद्या समोर आणू”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा