आर्थिक राशिभविष्य 25 मे 2026: वृषभसाठी मतभेदाची भीती! धनू राशीने सावध राहावे! तुमची राशी काय सांगते? पाहा, तुमचे राशिभविष्य


Finance Horoscope 25 May 2026 In Marathi: मेष, मिथुन, तूळसह या राशींसाठी नोकरी-व्यवसायात सकारात्मक बदल, वृषभ, कुंभसह या राशीच्या लोकांना भागीदारी, कायदेशीर गोष्टी याबाबतीत खास लक्ष द्यावे लागेल. कन्या, वृश्चिकसह या राशींनी वादविवाद आणि रागापासून दूर राहावे. चला तर पाहुया ज्योतिषी आचार्य कृष्ण दत्त शर्मा यांनी सांगितलेल्या आर्थिक आणि करिअर राशीभविष्यानुसार तुमची राशी काय सांगते? मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत वेळ कशी असेल सविस्तरपणे पाहूया.

Career Horoscope 17 Feb 2026 (1)
Arthik Rashi Bhavishya 25 May 2026: मेषसाठी नोकरीत बदलाचे संकेत, कर्कसाठी कामाचा ताण वाढेल, कन्या राशीने रागावर नियंत्रण ठेवा, वृश्चिकची आर्थिक स्थिती मजबूत, मकरसाठी आर्थिक स्थैर्य वाढण्याचे योग तर मीन राशीची व्यापारात प्रगती होणार, चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी सोमवार कसा असेल, आर्थिक कुंडली काय सांगते, सविस्तरपणे जाणून घेऊया.

मेष आर्थिक राशिभविष्य – नोकरीत बदलाचे संकेत

मेष आर्थिक राशिभविष्य - नोकरीत बदलाचे संकेत

मेषचे जातक सोमवारी वेगाने पुढे जातील. नोकरी करणाऱ्यांसाठी बदली किंवा विभाग बदलाची सूचना मिळू शकते. तुमची प्रगती पाहून सर्व लोक थक्क होतील. बॉसच्या अपेक्षांवर खरे उतरणार आहात. सकारात्मक बातमी मिळाल्याचे योग असून अपार आनंद होईल. फ्रिलान्समध्ये काम करत असाल तर चांगला प्रोजेक्ट मिळण्याचा योग आहेत. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा म्हणजे आर्थिक स्थिती सुधारेल.

वृषभ आर्थिक राशिभविष्य – भागीदारीत मतभेदाची भीती

वृषभ आर्थिक राशिभविष्य - भागीदारीत मतभेदाची भीती

वृषभसाठी ऑफिसमध्ये कौतुकाचा योग आहे. आत्मविश्वास वाढल्याने दुप्पट वेगाने काम करणार आहात. नोकरी-व्यवसायाच्या संदर्भात वेळ चांगली आहे. नोकरीत तुमच्या बोलण्यानुसार प्रोजेक्टमध्ये बदल होतील. व्यवसायात एखादी डिल होवू शकते. दस्तऐवज जपून ठेवा. दरम्यान भागीदारीत मतभेदाची शक्यता आहे, पण समजूतदारपणे काम केले तर समस्या येणार नाही. घरात वातावरण ठिक असेल.

मिथुन आर्थिक राशिभविष्य – मानसिक समाधान मिळेल

मिथुन आर्थिक राशिभविष्य - मानसिक समाधान मिळेल

मिथुन राशीसाठी सोमवार ठिक आहे. संघर्षानंतर त्रासातून काहीसा दिलासा मिळाल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. जे काम कराल त्यात नशिबाची साथ असेल. वाढत चाललेल्या आर्थिक कष्टातून थोड्या प्रमाणात तरी मुक्ती मिळण्याचे योग आहेत. प्रलंबित असलेला प्रोजेक्ट अचानक सुरु होईल. प्रवासाचा योग आहे पण त्यात लाभ दिसतोय.

कर्क आर्थिक राशिभविष्य – कामात फोकस वाढवा

कर्क आर्थिक राशिभविष्य - कामात फोकस वाढवा

कर्कसाठी सोमवारी ऑफिसमध्ये जरा जास्त धावपळ असेल. एखादा प्रोजेक्ट तातडीने पूर्ण करून द्यावा लागेल. टीमवर्कवर बारीक लक्ष द्या त्यामुळे कामाचा वेग वाढेल. कामासाठी जास्त वेळ द्यावा लागला तरी चालेल पण काम चोख करा. मेहनतीचे उत्तम फळ मिळेल यात शंकाच नाही. व्यवसायात नियोजन आणि व्यवस्थापनावर भर देणे गरजेचे आहे. घरातील वातावरण सकारात्मक असेल.

सिंह आर्थिक राशिभविष्य – वेळेनुसार नियोजन महत्त्वाचे

सिंह आर्थिक राशिभविष्य - वेळेनुसार नियोजन महत्त्वाचे

सिंह राशीचे लोक स्पर्धेच्या क्षेत्रात पुढे जाणार असून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. वेळेनुसार कामाचे नियोजन लाभदायक आहे. राजकीय क्षेत्रात असाल तर काम पटापट मार्गी लागेल. लोकांवर तुमच्या बोलण्याचा उत्तम प्रभाव असेल. मुलांच्या काही जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहात. सतत काम करत असताना आहार आणि आरामाकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या आर्थिक राशिभविष्य – रागावर नियंत्रण ठेवा

कन्या आर्थिक राशिभविष्य - रागावर नियंत्रण ठेवा

कन्या राशीने सोमवारी रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणाला ही अपशब्द बोलू नका. सोमवारी क्रिएटीव्ह कामात यश असून मानसिक समाधान मिळेल. विपरीत परिस्थितीत संयमाने वागा. कुटुंबातील प्रत्येक सदस्य तुम्हाला मदत करायला पुढे येईल. कुटुंबात सुख समाधान असून संध्याकाळी अचानक धनलाभाचे योग आहेत.

तूळ आर्थिक राशिभविष्य – मिळकतीचे मार्ग खुले होणार

तूळ आर्थिक राशिभविष्य - मिळकतीचे मार्ग खुले होणार

तूळ राशीसाठी सोमवारी धावपळ जास्त असेल, मेहनतीमुळेच काम पूर्ण होईल. मिळकतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत. तसेच प्रभावी बोलण्याचा उत्तम परिणाम दिसून येईल. प्रवासाचा योग असून त्यातून लाभ आहे. क्रिएटीव्ह क्षेत्रातील लोकांसाठी लाभाची संधी असेल. जोडीदाराचे सहकार्य आणि सहवास मिळाल्यामुळे मानसिक समाधानात वाढ होईल.

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य – वादविवादापासून दूर राहा

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य - वादविवादापासून दूर राहा

वृश्चिकची आर्थिक स्थिती मजबूत असून प्रत्येक कामात यश आहे.थांबलेली कामे पूर्ण होणार तसेच प्रियजनांच्या भेटीने मानसिक समाधान मिळेल. बँक बॅलन्स वाढल्यामुळे गुंतवणुकिचा विचार नक्की करा पण सल्ला महत्त्वाचा आहे. वादविवादापासून दूर राहा. आपुलकीने वागणे आणि समजून घेणे

धनू आर्थिक राशिभविष्य – मेहनत जास्त तर यश

धनू आर्थिक राशिभविष्य - मेहनत जास्त तर यश

धनू राशीने सावध राहणे गरजेचे आहे कारण फसवणुकीची शक्यता दिसते आहे. कोर्ट कचेरी किंवा कायदेशीर वाद सुरु असेल तर मेहनत जास्त करावी लागेल. सरकारी ऑफिसमध्ये जास्त चकरा माराव्या लागतील. विरोधातील षडयंत्र अपयशी ठरेल. सोमवारी भरपूर शॉपिंग करणार असून गृहोपयोगी वस्तूंवर पैसे खर्च होतील. घरातील सुख सुविधा वाढल्याने समाधानी असाल.

मकर आर्थिक राशिभविष्य – व्यवसायात बदलाचा योग

मकर आर्थिक राशिभविष्य - व्यवसायात बदलाचा योग

मकरसाठी सोमवार व्यवसायासाठी महत्त्वाचा आहे कारण बदलाची योजना आखणार आहात. स्पर्धा परीक्षा दिली असेल तर उत्तम यश मिळेल. आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होते आहे याचा अर्थ अनावश्यक खर्च करावा असे नाही. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करणार आहात. गाडी असेल तर त्याची काळजी घ्या कारण त्यातील बिघाड खर्च वाढवेल.

कुंभ आर्थिक राशिभविष्य – तज्ज्ञाचा सल्ला महत्त्वाचा

कुंभ आर्थिक राशिभविष्य - तज्ज्ञाचा सल्ला महत्त्वाचा

कुंभ राशीच्या लोकांनी जास्त विचार करणे कमी करा. व्यवसायात सहकाऱ्यांचा आदर करा, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. काम करताना सावध रहावे. मालमत्ता खरेदी विक्री करण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबींचा गांभीर्याने विचार करायला हवा. ताणतणाव वाढू देवू नका, चिडचिड कमी करा. जो काही निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी सखोल अभ्यास किंवा तज्ज्ञाचा सल्ला महत्त्वाचा असेल.

मीन आर्थिक राशिभविष्य – व्यापारात प्रगतीचे योग

मीन आर्थिक राशिभविष्य - व्यापारात प्रगतीचे योग

मीन राशीसाठी सोमवारी ज्येष्ठांचा सल्ला ऐकल्यामुळे काम पटापट मार्गी लागेल. नोकरीत काम जास्त आहे तेव्हा टीम वाढविण्याबद्दल वरिष्ठांना विचारावे लागेल. व्यापारात प्रगतीचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठी वातावरण रिलॅक्स आहे. कामानिमित्त प्रवास आहे, प्रवासात सावध राहा कारण चोरीची भीती आहे.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा