मुंबईकर वसीम जाफर झाला मेंटॉर, कोणत्या टीमने दिली कोचिंगची जबाबदारी? | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

टीम इंडियाचा माजी ओपनर वसीम जाफर याला नवी जबाबदारी मिळाली आहे. वसीम जाफर याची मेंटॉर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईकर वसीम जाफर झाला मेंटॉर, कोणत्या टीमने दिली कोचिंगची जबाबदारी?
मुंबईकर वसीम जाफर झाला मेंटॉर, कोणत्या टीमने दिली कोचिंगची जबाबदारी?

मुंबई : टीम इंडियाचा माजी ओपनर वसीम जाफर याला नवी जबाबदारी मिळाली आहे. वसीम जाफर याची मेंटॉर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वसीम जाफर आता हैदराबादच्या खेळाडूंना क्रिकेट कोचिंग देणार आहे. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये वसीम जाफरने सर्वाधिक रन केल्या आहेत तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही भारताचं प्रतिनिधीत्व कलं आहे. भारतातल्या तंत्रशुद्ध बॅटरपैकी एक अशी ओळख वसीम जाफरने तयार केली, त्याचमुळे हैदराबादच्या रणजी टीमने वसीम जाफरला नवी जबाबदारी दिली आहे.

वसीम जाफर रणजी ट्रॉफीच्या या मोसमात हैदराबादच्या टीमसोबत दिसेल आणि त्यांच्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन करेल. याआधीही वसीम जाफरला कोचिंगचा अनुभव आहे. जाफरला हैदराबादचा मेंटॉर करण्यामागे अंबाती रायुडूची भूमिका असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘काही टेकनिकल आणि औपचारिकता वगळता हा निर्णय अंतिम झाला आहे, 30 जून रोजी याची औपचारिक घोषणा केली जाईल’, असं हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे सचिव टी. बसवराजू म्हणाले.

अंबाती रायुडूची काहीच दिवसांपूर्वी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा डायरेक्टर म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता वसीम जाफरची हैदराबादच्या टीममध्ये एन्ट्री झाली आहे. वसीम जाफरला हैदराबादचा मेंटॉर करण्यात रायुडूची भूमिका असल्याचं बसवराजू म्हणाले.

जाफरला कोचिंगचा अनुभव

वसीम जाफर याला याआधीही कोचिंगचा अनुभव आहे. याआधी जाफर उत्तराखंडचा कोच होता, तर मागच्यावर्षी तो विदर्भाचा बॅटिंग सल्लागार होता. आयपीएलमध्ये वसीम जाफर पंजाब किंग्सच्या कोचिंग स्टाफचाही भाग होता. याचसोबत त्याला बांगलादेशच्या टीमसोबत काम करण्याचा अनुभवही आहे.

जाफरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

वसीम जाफरने भारतासाठी 31 टेस्ट मॅच खेळल्या यात त्याने 34.11 च्या सरासरीने 1944 रन केल्या. वसीम जाफरच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 5 शतकं आणि 11 अर्धशतकं आहेत. जाफरचा टेस्ट क्रिकेटमधला सर्वाधिक स्कोअर 212 रन आहे. याशिवाय भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्येही तो सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *