Akola: तो तिथे आला अन् महिला सुरक्षारक्षकावर उचलला हात, रुग्णालयात मारहाणीचा VIDEO व्हायरल | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

एनआयसी कक्षाजवळ ड्युटीवर असलेल्या महिला सुरक्षारक्षक कर्तव्य बजावत असताना अचानक आरोपी प्रदीप गावंडे हा तिथे आला आणि

News18
News18

अकोला : अकोला शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात कर्तव्य बजावणाऱ्या एका महिला सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यावर रुग्णाच्या पतीने अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  अकोला शहरातील जिल्हास्तरीय स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणात महिला रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात. याच दरम्यान एका महिला रुग्ण आणि तिच्या पतीमध्ये काही कारणावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

वाद सुरू असताना रुग्णालयातील महिला सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गोष्टीचा राग मनात धरून काही वेळानंतर आरोपीनं  महिला सुरक्षा रक्षकावर हल्ला केला.  महिला सुरक्षारक्षकाला मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सीसीटीव्हीत काय दिसलं? 

एनआयसी कक्षाजवळ ड्युटीवर असलेल्या महिला सुरक्षारक्षक कर्तव्य बजावत असताना अचानक आरोपी प्रदीप गावंडे हा तिथे आला आणि सुरक्षारक्षक महिलेवर हात उचलला. ही घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे. घटनेनंतर एनआयसी कक्षातील कर्मचाऱ्यांनी तातडीने 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. रामदास पेठ पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *