अभिनेत्री छाया कदम आपल्या भूमिकेबद्दल म्हणाल्या, “कलाकार म्हणून कायमच मला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते. अशी वेगळी आणि आव्हानात्मक व्यक्तिरेखा आपल्या वाट्याला यावी, अशी माझी नेहमीच अपेक्षा असते. ‘भूतम भयम’मधील ‘जठाई’ ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात वेगळ्या भूमिकांपैकी एक आहे. तिचं दिसणं, बोलणं, हसणं, चालणं या प्रत्येक गोष्टीवर मला विशेष मेहनत घ्यावी लागली.”