EPFO: पीएफ खात्यात लवकरच व्याजाची रक्कम, दरमहा कसा वाढतो तुमचा PF बॅलेन्स? समजून एका क्लिकवर – Marathi News | EPFO Interest amount to be credited to PF accounts soon how does your PF balance grow month by month Find out with just one click


पीएफ खात्यात लवकरच व्याजाची रक्कम

EPFO PF Interest Rate: पीएफ खात्यात व्याजाची रक्कम लवकरच जमा होणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25% दराने व्याजाची रक्कम जमा होईल. केंद्रीय कामगार मंत्री मनसूख मांडविया यांच्या माहितीनुसार, 15 जुलैपर्यंत व्याजाची रक्कम सर्व पीएफ सदस्यांच्या खात्यात दिसेल. पासबुकमध्ये ही अपडेट दिसेल. पण व्याजाची रक्कम दरमहा मिळते की वर्षाला? याविषयी अनेक कर्मचार्‍यांच्या मनात संभ्रम आहे.

EPF चे व्याज कसे मोजले जाते?

अनेक कर्मचाऱ्यांना वाटते की व्याजदर 8.25% वार्षिक आहे. प्रत्येक महिन्याला त्याला 12 ने भागून व्याज जोडले जाते. पण असे नाही. EPFO व्याजाची गणना दर महा होते. पण व्याजाची रक्कम खात्यात वर्षात केवळ एकदाच जमा होते. दरमहा जी रक्कम खात्यात जमा होते, त्या बॅलेन्सवर तुम्हाला व्याज देण्यात येते. दर महिन्याला तुमच्या पीएफ खात्यात योगदानाची रक्कम जमा होते. यामुळे एकूण जमा रक्कम वाढते. दुसऱ्या महिन्यातील रक्कमेवरील व्याजाची रक्कम वाढते. तिसऱ्या महिन्यात त्यात अजून भर पडते. त्याला पॉवर ऑफ कम्पाऊंडिंग असे म्हटले जाते. यामुळे सेवानिवृत्तीवेळी मोठी रक्कम मिळते.

2 लाखांच्या शिल्लकीवर किती व्याज?

समजा तुमच्या PF खात्यात वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 एप्रिल रोजी 2 लाख रुपये आहेत. त्यावर 8.25% वार्षिक व्याज म्हणजे दरमहा जवळपास 0.6875% व्याज मिळेल. EPFO सर्वात अगोदर तुमच्या 2 लाखांवरील व्याज मोजेल. मे महिन्यात जे नवीन योगदान रक्कम जमा होईल. ते जुन्या शिल्लक रक्कमेत जमा होईल. आता जी नवीन रक्कम असेल त्यावर व्याजदर मिळेल. ही प्रक्रिया दर महिन्याला सुरू असेल. तुमची प्रिन्सिपल अमाऊंट वाढत राहील आणि त्यावरील व्याजही वाढत राहील. व्याजावर व्याजाचा लाभ मिळेल. आर्थिक वर्ष संपल्यावर पासबुकमध्ये ही रक्कम दिसेल.

PF बॅलेन्स कसे तपासाल?

तुमच्या पीएफ खात्यात व्याज जमा झाले की नाही, अथवा तुमच्या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे हे तपासण्यासाठी सोपी पद्धत आहे.

मिस्ड कॉल द्वारे जाणून घ्या : मिस्ड कॉल द्वारे पीएफ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे हे तपासता येते. रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या. दोन रिंगनंतर कॉल कट होईल आणि तुम्हाला SMS येईल. त्यात तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे याची माहिती मिळेल.

SMS च्या माध्यमातून जाणून घ्या शिल्लक रक्कम: फोनमधील मॅसेज बॉक्समध्ये जा. EPFOHO UAN MAR असे टाईप करा आणि हा मॅसेज 7738299899 या क्रमांकावर पाठवा. इतर भाषांसाठी इतर शॉर्टफॉर्मचा वापर करा. तुम्हाला पीएफ खात्यातील रक्कम आणि व्याज याची माहिती मिळेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *