Gaurav More On Pritam And Pedro Web Series: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून (Maharashtrachi Hasyajatra) घराघरांत पोहोचलेला आणि ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ (Filter Padyacha Bachchan) म्हणून ओळखला जाणारा मराठी मनोरंजन विश्वातील (Marathi Entertainment World) मराठमोळा अभिनेता (Marathi Actor) म्हणजे, गौरव मोरे (Gaurav More). त्याच्या आगळ्या वेगळ्या, पण क्लासी कॉमेडी स्टाईलनं (Comedy Style) त्यानं सर्वांना आपलंस केलं. त्याची हटके शैली आणि दमदार अभिनयाचे अनेक चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर गौरव मोरेनं अनेक प्रोजेक्ट्स केले, पण तरीसुद्धा त्याला ओळखलं जातं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळेच. नुकताच गौरव मोरे एका हिंदी वेब सीरिजमध्ये झळकलाय. राजकुमार हिरानींच्या ‘प्रीतम अँड पेड्रो’ (Pritam And Pedro) वेब सीरिजमध्ये (Web Series) गौरवनं चोराची भूमिका साकारलीय. त्याच्या या भूमिकेचं सर्वांकडून कौतुक केलं जातंय. अशातच हिंदी वेब सीरिजमध्ये केलेल्या कामावर गौरव मोरेनं भाष्य केलंय. त्याचं हे वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे नेमकं काय म्हणाला?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे म्हणाला की, “राजकुमार हिरानी यांनी बोलावल्यावर पुढचे सगळे प्रश्नच संपतात. त्यांच्यासोबत आधी ‘संजू’ या सिनेमात काम केल्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत मला माहीत होती आणि मी कसं काम करतो हे त्यांना माहीत होतं, त्यामुळे त्यांनी ‘प्रीतम अँड पेड्रो’साठी माझी ऑडिशन घेतली नाही. पहिल्या फोनमध्येच भूमिका अमुक स्वरुपाची आहे आणि ती तू साकारणार आहेस, हे सांगितलं. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी मी पोहोचलो…”
“अविनाश अरुण यांनी माझ्याकडून ती भूमिका उत्तमप्रकारे काढून घेतली, हे नमूद करायला हवं. हिरानी सरांकडे काम करायला मला नेहमीच मजा येते. त्यांच्यामुळे वेब विश्वात पदार्पण करू शकलो. मी साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय, यापेक्षा एका कलाकाराला आणखी काय हवं!”, असं गौरव मोरे म्हणाला.
“भूमिकेच्या लांबी-रुंदीपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं आहे, हे माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं आहे. राजकुमार हिरानी यांच्यासारखी मोठी व्यक्ती फोन करते, तेव्हा काहीच प्रश्न उरत नाहीत. त्यांना त्या विशिष्ट कामासाठी मला विचारावंसं वाटलं, यातच मी जिंकलो!”, असं गौरव मोरे यानं ‘मुंबई टाईम्स’शी बोलताना सांगितलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :