राऊत कुटुंबीयांच्या अडचणीत मोठी वाढ! अखेर दोघांना अटक, मध्यरात्रीच उचललं; गिरिजा राऊतांचे ते आरोप भोवणार? – Marathi News | Girija Raut Case Two Arrested Fake Godman Held as Probe Into Allegations Against Raut Family Intensifies


माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणात नवे वळण आले आहे. या प्रकरणात आता दोघांना अटक करण्यात आली असून, त्यातील एका भोंदू बाबाला मध्यरात्री उचलण्यात आले आहे. यामुळे राऊत कुटुंबीयांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

दोन जणांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी राऊत कुटुंबीयांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांच्या कोणत्याही संपर्काला राऊत कुटुंबाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असा पोलिसांचा दावा आहे. सूनेच्या तक्रारीनुसार या प्रकरणात एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील भोंदू बाबा फिरोज शेख याला कापूरबावडी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. त्यानंतर त्याला कुडाळमधून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात गिरीजा राऊत यांच्यावर लावण्यात आलेले गंभीर आरोप आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सूनेच्या तक्रारीवरून केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण राऊत कुटुंबीयांवर दबाव वाढला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, आणखी काही आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात देखील चर्चेला उधाण आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

गितेश राऊत यांच्या पत्नीने गिरिजाने पोलिसात राऊत कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. गिरिजा राऊत यांनी तक्रारीमध्ये पती गितेश राऊत यांच्याविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र, गिरिजा यांनी माध्यमांसमोर तिची फसवणूक झाल्याचे तसेच खोटे आरोप केल्याचे सांगितले आहे.

अघोरी कृत्याविषयी बोलताना गिरिजा म्हणाली, अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे घेऊन जायचे. जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता. मासाचे तुकडे अंगावरून उतवरत होते. तांब्याची तार उतरवत होते. कोण कणकेच्या बाहुल्या, माझ्या अंगावरील न धुतलेले वापरलेले कपडे, डोक्याचे केस घेऊन उतारे करत होते. हळद खायला द्यायचे. अगरबत्तीची उदी तीर्थ पेलाभरून द्यायचे. गोमूत्र द्यायचे. मुलाचं शारिरीक संबंध ठेवण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी प्लानिंग करून माझं आयुष्य बरबाद केलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *