बाथरूमच्या दरवाजाला छिद्र पाडून बहिणींचे अश्लील व्हिडिओ, पुरावेही सापडले; पण पोलिसांच्या एका चुकीमुळे नराधम सुटला! | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

Obscene Video Maker Arrested Granted Bail: आपल्याच कुटुंबातील निष्पाप अल्पवयीन मुली आणि महिलांचे बाथरूममध्ये चोरून न्यूड व्हिडिओ बनवणाऱ्या एका २३ वर्षीय विकृत तरुणाला पोलिसांनी अटक केली.

प्रतिकात्मक फोटो - बाथरूमच्या दरवाजाला छिद्र पाडून बहिणींचे अश्लील व्हिडिओ,  पुरावेही सापडले; पण पोलिसांच्या एका चुकीमुळे नराधम सुटला!
प्रतिकात्मक फोटो – बाथरूमच्या दरवाजाला छिद्र पाडून बहिणींचे अश्लील व्हिडिओ, पुरावेही सापडले; पण पोलिसांच्या एका चुकीमुळे नराधम सुटला!

कानपूर: आपल्याच कुटुंबातील निष्पाप अल्पवयीन मुली आणि महिलांचे बाथरूममध्ये चोरून न्यूड व्हिडिओ बनवणाऱ्या एका २३ वर्षीय विकृत तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्या गुगल ड्राईव्हवर पोलिसांना व्हिडीओही मिळाले. मात्र, पोलिसांच्या एका चुकीने या नराधमाची सुटका झाली. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.

गुगलच्या गुप्त माहितीमुळे नराधमाचा पर्दाफाश

मिळालेल्या माहितीनुसार, चमनगंज येथे जनरल स्टोअर्स आणि डायपरचा होलसेल व्यवसाय करणाऱ्या या २३ वर्षीय नराधमाने स्वतःच्या चुलत बहिणीसह नात्यातील ८ वर्षांच्या चिमुरडीचे आणि इतर महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ चोरून बनवले. पकडले जाऊ नये म्हणून हे सर्व व्हिडिओ त्याने गुगल ड्राईव्हमध्ये लपवून ठेवले होते. मात्र, युनायटेड स्टेट्सच्या ‘नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉइटेड चिल्ड्रन’ (NCMEC) या संस्थेला गुगलच्या माध्यमातून याची माहिती मिळाली. त्यांनी भारताच्या सायबर पोर्टलवर ही तक्रार नोंदवली. यानंतर सायबर टीमने मोबाईल नंबर, IMEI नंबर आणि ई-मेल आयडी ट्रेस करून आरोपीला चमनगंज येथून अटक केली.

पोलिसांची कोणती चूक भोवली?

पोलिसांना आरोपीविरोधात पुरावे जमा करण्यास यश मिळाले. मात्र, पोलिसांनी गुन्ह्याची कलमे लावण्यात केलेल्या गंभीर चुकीमुळे (तांत्रिक त्रुटी) या नराधमाला कोर्टातून तात्काळ जामीन मंजूर झाला आहे. आरोपीने व्हिडिओ बनवण्यासाठी बाथरूमच्या दरवाजाला मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या आकाराचे छिद्र पाडले होते, ज्यातून तो हे अश्लील कृत्य करायचा. पोलिसांनी त्याच्या मोबाईलच्या ‘गुगल ड्राईव्ह’मधून (Google Drive) १५ अश्लील व्हिडिओ जप्त केले आहेत.

या प्रकरणात वकिलांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, हे प्रकरण रक्ताच्या नात्यातील असल्याने पोलिसांनी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत (POCSO Act) कडक कलमे लावून कोठडीची मागणी करायला हवी होती, असे म्हटले आहे.

‘बॅड टच’चे व्हिडिओ आणि पोलिसांची गंभीर चूक

एडीसीपी (क्राइम) अंजली विश्वकर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मोबाईलमधून जप्त केलेल्या १५ व्हिडिओंपैकी काही व्हिडिओंमध्ये तो लहान मुलींना ‘बॅड टच’ (अयोग्य स्पर्श) करतानाही दिसत आहे.

याप्रकरणी चमनगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी रिकेश सिंह यांनी सांगितले की, आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७५, ७७ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ७/८ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. शनिवार, ११ जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. परंतु, पोलिसांनी लावलेली ही सर्व कलमे जामीनपात्र (Bailable) असल्याने मॅजिस्ट्रेट कोर्टातून त्याला लगेच जामीन मिळाला. तपास सुरू असून पुरावे मिळताच कलमे वाढवली जातील, असे पोलिसांनी सांगितले.

पोलीस चुकले; वकिलांनी पकडली त्रुटी

वरिष्ठ वकील शिवाकांत दीक्षित यांनी सांगितले की, पोलिसांनी कलमे लावण्यात मोठी चूक केली आहे. हे प्रकरण रक्ताच्या नात्यातील आणि घरातील व्यक्तीशी संबंधित असल्याने पोलिसांनी ‘पोक्सो’ कायद्याच्या कलम ९ (N) आणि कलम १० अंतर्गत कारवाई करायला हवी होती, जी अजामीनपात्र (Non-bailable) आहेत. तसेच, गुगल ड्राईव्हमधील हे व्हिडिओ त्याने डार्क वेबवर विकले आहेत का, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची (Remand) मागणी करता आली असती. पोलिसांच्या या ढिसाळ कारभारामुळे पीडित महिला आणि मुलींना धक्का बसला असून परिसरात संताप व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या/देश/

बाथरूमच्या दरवाजाला छिद्र पाडून बहिणींचे अश्लील व्हिडिओ, पुरावेही सापडले; पण पोलिसांच्या एका चुकीमुळे नराधम सुटला!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *