Bachchu Kadu on fadanvis: ‘फलटण प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा…’; बच्चू कडूंचा महायुतीवर हल्लाबोल, म्हणाले, ‘हे सरकार बनवाबनवी करतं’
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
शेकऱ्याचं आयुष्यच काळं आहे. दिवाळीचं काय घेऊन बसलात त्यांनी दोन लाखाचे फटाके फोडले आणि शेकऱ्यांना पाच हजारात बुडवून टाकले. शेतकऱ्यांची तीळ मात्र कदर या सरकारला नाही. धर्म आणि जातीच्या राजकारणात शेतकरी हा छोटा केला आहे. शेतकऱ्यांसाठी सरकार काही करेल असे मला वाटत नाही, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. ते आज माध्यमांशी बोलत होते.
दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी करू म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता मार्चपर्यंत वेळ आहे, असं म्हणतात. देशात सगळ्यात लबाड बोलणारा मुख्यमंत्री कोण असेल तर देवेंद्र फडणवीस, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. बनवाबनवी तर बनिया करत नाही, एवढी बनवाबनवी हे सरकार करत आहे, अस ते म्हणाले आहेत. Beed News: ‘मला पक्षाची सत्ता आणायची आहे, मी जरांगे पाटील यांच्या…’; पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या? सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करत नाहीत आणि व्यापाऱ्यांना सांगतात हमीभावा पेक्षा कमी भावाने व्यापाऱ्यांना माल देऊ नका. मग उरलेला माल काय भाजपच्या कार्यालयात टाकायचा का? किती ही बनवाबनवी करताय. कर्जमुक्ती, हमीभाव हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आमच्या डोक्यात निवडणुकीचा विचार नाही.
तेलंगणा सरकार हेक्टरी पाच हजार रुपये शेतकऱ्यांना देत आहे. नुकसान हो अथवा न हो. मग तुम्ही का देऊ शकत नाही, असं सवाल बच्चू कडू यांनी केला. तुम्ही शहराकडे जेवढे लक्ष देता त्याच्या 25% लक्ष ग्रामीण भागात देत नाही, शेतकरी हा जातीपातीत गुंडाळून ठेवायचा आणि शहराकडे लक्ष द्यायचं जाती-जातीत भांडण लावायचे आणि शहरा मात्र व्यवस्थित ठेवायचं, अशी या सरकारची व्यवस्था असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली. सुरजागडचा प्रकल्प तेथील लोखंड रत्नागिरीत पाठवायचे म्हणून शक्तिपीठ महामार्ग यांना करायचा आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
सुरजागडच्या कंपनीचा शेअर तीन वर्षांपूर्वी 6 रुपये होता. आता तो शेअर पंधराशे रुपये कसा झाला? यामध्ये कोणाची मिली भगत आहे. त्यामुळे जाऊ तिथे खाऊ अशी परिस्थिती या सरकारची आहे. गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे असताना फलटण, नागपूरमध्ये अशा घटना घडतात. त्यामुळे अंकुश कुठे राहिला नाही, त्यामुळे हा राज्याचा गृहमंत्री जनतेचा नसून फक्त भाजपचा कार्यकर्त्यांच्या आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. फलटणच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा नाही तर कमीत कमी माफी तर मागावी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा