पावसाळ्यात भारतातील या नयनरम्य सुंदर ठिकाणांना द्या भेट – Marathi News | Visit these picturesque and beautiful places in India during the monsoon season


पावसाळा ऋतू सुरू झाला की वातावरण आल्हाददायक बनते. तसेच निर्सगातील हिरवळ, धबधबे, ढगांनी वेढलेले डोंगर आणि थंडगार वाऱ्यामुळे नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलते. म्हणूनच या ऋतूत प्रवास करणे हा एक अनोखा अनुभव असतो. पावसाळ्यात तुम्ही जर काही ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. पण अनेकदा लोकप्रिय ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते. अशावेळेस कमी गर्दीच्या आणि निसर्गाच्या सान्निध्यात असलेले ठिकाणी जाणे अधिक चांगला पर्याय ठरू शकतो.

भारतात अशी अनेक सुंदर ठिकाणं आहेत जी अजूनही जास्त प्रसिद्ध नाहीयेत. ही ठिकाणे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, शांत वातावरणासाठी आणि अनोख्या अनुभवांसाठी ओळखली जातात. पावसाळ्यात या ठिकाणांचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते, ज्यामुळे त्यांना भेट देण्याचा अनुभव अधिकच खास बनतो. जर तुम्ही या पावसाळ्यात गर्दीपासून दूर असलेल्या एखाद्या नवीन आणि सुंदर ठिकाणाच्या शोधात असाल, तर भारतातील ही लपलेली ठिकाणं तुमच्या प्रवासाच्या यादीत समविष्ट करा.

पावसाळ्यात तुम्ही अवश्य भेट द्यायलाच हवी अशी भारतातील 5 ठिकाणं

झिरो व्हॅली, अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेशातील झिरो व्हॅली ही हिरवीगार दरी, भातशेती आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथील नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलते. ढगांनी वेढलेल्या डोंगर आणि थंडगार वाऱ्यामुळे हे निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफी शौकिनांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे.

अगुंबे शिवमोग्गा जिल्हा, कर्नाटक

अगुंबेला दक्षिण भारताचे चेरापुंजी म्हणूनही ओळखले जाते. येथे मुसळधार पावसामुळे जंगले, धबधबे आणि दऱ्या खरोखरच विस्मयकारक दिसतात. हे ठिकाण ट्रेकिंग, निसर्ग आणि सूर्यास्ताच्या दृश्यांसाठीही ओळखले जाते.

ताम्हिणी घाट पुणे जिल्हा, महाराष्ट्र

पुण्याजवळील ताम्हिणी घाट पावसाळ्यात हिरवळ, धबधबे आणि धुक्याने वेढलेला असते. पावसाळ्यात येथील नैसर्गिक दृश्य खरोखरच मनमोहक असते. वीकेंड ट्रिप आणि रोड ट्रिपसाठीही हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.

पोनमुडी तिरुवनंतपुरम जिल्हा, केरळ

केरळमधील पोनमुडी हिल स्टेशन हे तिथल्या वळणदार रस्त्यांसाठी, चहाच्या मळ्यांसाठी आणि ढगांनी वेढलेल्या टेकड्यांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथील हिरवळ अधिकच खुलून दिसते. येथील शांत वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे हे ठिकाण कुटुंबे आणि जोडप्यांसाठी एक आदर्श पर्यटन स्थळ ठरते.

मांडू धार जिल्हा, मध्य प्रदेश

मांडू हे त्याच्या ऐतिहासिक किल्ल्यांसाठी, राजवाड्यांसाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. पावसाळ्यात येथील डोंगर आणि तलाव पाहण्यासारखे असते. हिरव्यागार वनराईने वेढलेले हे ऐतिहासिक शहर इतिहास आणि निसर्गाचा एक अनोखा संगम सादर करते.

पावसाळ्यात या अप्रतिम ठिकाणांना भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे आणि तिथे कसे पोहोचायचे?

या सर्व ठिकाणांना भेट देण्यासाठी जुलै ते सप्टेंबर हा सर्वोत्तम काळ आहे. झिरो व्हॅलीच्या सर्वात जवळचा विमानतळ लीलाबारी आहे आणि रेल्वे स्टेशन नाहरलागून आहे. शिवमोग्गा आणि उडुपीहून रस्त्याने अगुंबेला सहज पोहोचता येते.

पुण्यापासून ताम्हिणी घाट रस्त्याने सुमारे दोन तासांच्या अंतरावर आहे. पोनमुडीला रस्त्याने पोहोचता येणारे सर्वात जवळचे शहर तिरुवनंतपुरम आहे. इंदूर आणि धार येथूनही मांडूला रस्त्याने सहज पोहोचता येते.

पावसाळ्यात या ठिकाणी प्रवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

पावसाळ्यात प्रवास करण्यापूर्वी, हवामानाची माहिती नक्की तपासा. निसरड्या रस्त्यांवर काळजीपूर्वक चाला आणि चांगली पकड असलेले बूट घाला. रेनकोट, छत्री आणि आवश्यक औषधे सोबत ठेवा.

वेगाने वाहणारे धबधबे किंवा नदीकिनारी जाणे टाळा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. तसेच पावसाळ्यात निसर्गाला भेट देताना आपल्या सभोवतालची स्वच्छता राखा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *