एअरटेलचा 28 दिवसांची वैधता आणि 15 ओटीटी ॲप्ससह ‘हा’ स्वस्त प्लॅन लाँच, जाणून घ्या किंमत – Marathi News | Airtel launches this affordable plan with 28 day validity and 15 OTT apps check the price


एअरटेल कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी28 दिवसांच्या वैधतेसह 200 रुपयांचा सर्वात स्वस्त नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये अनेक मनोरंजनात्मक फायदे आणि अनलिमिटेड 5जी डेटादेखील मिळत आहे. हा नवीन 200 रुपये किंमतीचा एअरटेल प्लॅन अशा ग्राहकांसाठी आहे, ज्यांना अतिरिक्त डेटा आणि प्रीमियम ओटीटी कंटेंटचा ॲक्सेस हवा आहे. चला तर मग या नवीन रिचार्ज प्लॅनचे फायदे जाणून घेऊयात.

या एअरटेल प्रीपेड प्लॅनसोबत तुम्हाला 28 दिवसांची वैधता आणि 30 जीबी हाय-स्पीड डेटा मिळेल. कंपनी अनलिमिटेड 5 जी डेटादेखील देत आहे, जो तुम्ही तुमच्या सध्याच्या प्लॅनचा डेटा संपल्यानंतर वापरू शकता, मात्र यासाठी तुम्ही कंपनीच्या 5जी नेटवर्क असलेल्या क्षेत्रात असणे आणि तुमच्याकडे 5जी स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. हा प्लॅन रिलायन्स जिओच्या 200 रूपयांच्या ओटीटी पासला टक्कर देऊ शकतो.

जिओ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन

या 200 रुपयांच्या प्लॅनसोबत तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसह 149 रुपये किमतीचा जिओ हॉटस्टार ॲक्सेस मिळेल, जेणेकरून तुम्ही तुमच्या मोबाईलवर लाईव्ह स्पोर्ट्स, चित्रपट, हॉटस्टार स्पेशल आणि इतर कंटेंटचा आनंद घेऊ शकाल.

एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम देखील 28 दिवसांसाठी दिले जात आहे, याच्या माध्यमातून तुम्हाला एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्लॅटफॉर्मवर लायन्सगेट प्ले, सोनी लिव्ह, आहा प्रीमियम, चौपाल, सनएनएक्सटी आणि इतर अनेक 18 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मचा ऍक्सेस मिळेल.

डेटा संपल्यानंतर किती शुल्क आकारले जाईल?

प्लॅनच्या तपशिलानुसार 30 जीबी पलीकडील डेटा वापरासाठी प्रति एमबी 50 पैसे शुल्क आकारले जाईल. हा ॲड-ऑन अशा प्रीपेड वापरकर्त्यांसाठी एक अतिरिक्त रिचार्ज म्हणून तयार करण्यात आला आहे, ज्यांना एकाच रिचार्जमध्ये तुम्ही डेटा वाढवायचा आहे आणि ओटीटी स्ट्रीमिंगचा लाभ घ्यायचा आहे.

जिओचा 200 रुपयांचा प्लॅन

जिओच्या 200 रूपयांच्या ओटीटी पासमध्ये 28 दिवसांची वैधता आणि 30 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये जिओ हॉटस्टार, यूट्यूब प्रीमियम आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाईल ॲडिशनचा ॲक्सेस समाविष्ट आहे. या प्लॅनमध्ये एकूण १६ ओटीटी ॲप्सचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *