PF वरील व्याजदरात वाढ?Image Credit source: एजन्सी
EPFO New Update: केंद्र सरकारने कामगार संहिता लागू केली आहे. सोबतच सामाजिक सुरक्षा संहिता , 2020 अंतर्गत केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 2026 (EPF Scheme 2026) ची अंमलबजावणी करण्यात आली आहे. नवीन योजनेने दीर्घकाळापासून सुरू असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 1952 ची जागा घेतली आहे. जुनी ईपीएफ योजना संपुष्टात आली आहे. नवीन नियम लागू झाले आहेत. ईपीएफओ (EPFO) च्या 7 कोटी कर्मचाऱ्यांना आता पीफवरील व्याजदर वाढीचा फायदा मिळेल का अशी चर्चा रंगली आहे. सध्या पीएफ खात्यात जमा होणाऱ्या रक्कमेवर 8.25 टक्के व्याजदर जाहीर करण्यात आला आहे.
नवीन ईपीएफ योजनेतंर्गत 8.25 टक्क्यांहून अधिक व्याज मिळेल?
नवीन ईपीएफ योजना लागू झाल्यानंतर पीएफवरील व्याज दरात कोणताही बदल होणार नाही. सध्या हा दर 8.25 टक्के इतका आहे. ईपीएफओकडून (EPFO) 1 जुलै 2026 रोजी याविषयीची अधिसूचना जाहीर करण्यात आली. त्यानुसार कामगार मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2025-26 साठी ईपीएफ योजनेतील पीएफ रक्कमेवर 8.25% दराने व्याज जमा करण्यास मंजूरी दिली आहे. अर्थात ही तरतूद जुनी ईपीएफ योजना, 1952 च्या निकष, नियमानुसार करण्यात आली आहे. पण सध्या व्याजदरात कोणताही बदल होणार नाही.
सामाजिक सुरक्षा संहिते अंतर्गत EPF
आता एक मोठा बदल झाला आहे. ईपीएफ योजना यापूर्वी केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध अधिनियम 1952 अंतर्गत येत होती. पण ईपीएफ योजना, 2026 ची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 (Code on Social Security 2020) अंतर्गत ईपीएफओ काम करेल. त्यामुळे पीएफ खातेदारांना सामाजिक सुरक्षा मिळेल. या बदलाचा कोणाताही नकारात्मक परिणाम खातेदारांवर होणार नाही.
डिजिटल सेवांची सुरुवात
नवीन योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे ईपीएफओ आता डिजिटल सेवा देणार आहे. कार्यलयात जाण्याची गरज भासणार नाही. पीएफ काढणे अधिक सोपे आणि सुलभ होईल. क्लेम सेटलमेंट तीन दिवसात पूर्ण होईल. तर ATM आणि युपीआय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लवकरच पीएफ रक्कम काढता येईल. कर्मचार्यांना सहज पीएफ खात्यातील पैसा काढता येईल. गरजेच्या वेळी त्यांना वाट पाहावी लागणार नाही. तर ऑनलाईन फायलिंगक, पीएफ रेकॉर्ड्स, डिजिटल अकाऊंट, ऑनलाईन क्लेम सबमिशन, ई-पासबुक आणि इतर सुविधांचा श्रीगणेशा होणार आहे.