केतन अग्रवाल, सिया गोयल, चेतन चौधरी Image Credit source: एजन्सी
Siya Goyal Middle Finger indication : केतन अग्रवाल याची विश्वासघाताने त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने खून केल्याचा आरोप आहे. प्रियकर चेतन चौधरीसोबत मिळून तिने केतनला लोहगडावरून ढकल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी सियाला तिच्या घरी नेले. तिथे तिचे कपडे आणि दुसरा मोबाईल जप्त केला. त्यात अनेक गुपीत सापडली. दरम्यान पोलिसांसोबत असणाऱ्या सियाने वार्तांकनासाठी समोर आलेल्या माध्यमांना मधले बोट दाखवत अश्लील कृत्य केले. या देहबोलीने तिच्यावर टीकेची झोड उठली. यावर आता तिच्या वडीलांनी मुलीचा तसा काही उद्देश नसल्याचे आणि मिडल फिंगर का दाखवले याचे स्पष्टीकरण दिले आहे.
असा केला वडीलांनी बचाव
आरोपी सिया गोयल हिने माध्यमांना पाहताच हाताचे मधले बोट उंचावले आणि माध्यमांकडे जळजळीत कटाक्ष टाकत ती पुढे गेली. त्याची देशभरात एकच चर्चा झाली. तिच्या या अश्लील कृतीने तिची नकारात्मक प्रतिमा सर्वांसमोर आली. इतक्या गंभीर गुन्ह्यात सहभागी असतानाही तिचा मिजास, मग्रुरी, उद्दामपणात तसूभरही फरक पडला नसल्याची चर्चा रंगली. त्यानंतर आता तिच्या वडीलांनी याप्रकरणी तिचा बचाव केला आहे.
सियाने माध्यमांना मधले बोट दाखवले ते अश्लील हावभाव म्हणून नव्हता. पोलिसांच्या कारमध्ये बसताना दरवाज्यात तिचे मधले बोट चेंगरले. ती जखम ती दाखवण्याचा प्रयत्न करत होती. तिचा तो उद्देश होता. तो कोणताही अश्लील इशारा नव्हता. मधले बोट दाखवण्याचा इतकाच इशारा होता की, पोलिसांच्या वाहनात बसताना दरवाजात तिचे बोट चंगरेल. बोटाला दुखापत झाली, असा बचाव तिच्या वडीलांनी केल्याचे समोर येत आहे.
साक्षीदार, चॅट आणि बरंच काही
याप्रकरणात पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात केतन अग्रवाल याला संपवण्याचा जो कट रचला गेला, त्याचा एक साक्षीदार होता. हा बीडचा तरुण असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना त्याची माहिती मिळाली आणि पुढील तपास सोपा झाला. हा साक्षीदार या प्रकरणाला कलाटणी देऊ शकतो. त्याने दोघांना हा खून करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचाही दावा करण्यात येतो.
दरम्यान पोलिसांनी नाट्यमयरित्या सियाला तिच्याच घरी नेत दुसरा मोबाईल जप्त केला. त्यात केतनसोबतचे चॅट, कोडवर्ड संभाषण समोर आले. त्यातील डिलिट डेटा लवकरच पोलिस हस्तगत करतील. पण सध्या हे दोन पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्याआधारे या प्रकरणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.