7000mAh बॅटरी, 12GB रॅम आणि 50MP कॅमेरा असलेला ओप्पोचा हा पॉवरफूल फोन भारतात लाँच – Marathi News | Oppo powerful phone featuring a 7000mAh battery 12GB RAM and a 50MP camera has been launched in India


भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत अनेक मोबाईल कंपन्या त्यानुसार फोन सादर करत असतात. अशातच ओप्पो कंपनीने त्यांच्या ओप्पो रेनो 16 सिरीजमध्ये नवीन ओप्पो रेनो 16c स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. तर या फोनच्या प्रमुख फिचर्समध्ये 7,000mAh बॅटरी, सोनी कॅमेरा सेन्सर, 80W फास्ट चार्जिंग आणि मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर यांचा समावेश आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. अशातच 50 हजार ते 56 हजार दरम्यान किंमत असलेला या फोनची विक्री सुरू झाल्यावर ओप्पो वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध होईल. चला तर मग या फोनची किंमत तसेच हा फोन कोणत्या दिवशी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे ते जाणून घेऊयात.

भारतातील ओप्पो रेनो 16c ची किंमत

या ओप्पो मोबाईलच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 46 हजार 999 रूपये आहे. तर 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटची किंमत 49 हजार 999 रूपये आणि 12GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटची किंमत 55 हजार 999 रूपये आहे. कंपनी SBI, HDFC बँक आणि इतर बँकांच्या क्रेडिट कार्डवर 10% इन्स्टंट कॅशबॅक देखील देणार आहे. स्पर्धेच्या बाबतीत हा नवीन ओप्पो स्मार्टफोन मोटोरोला रेझर 60 आणि गूगल पिक्सल 10a सारख्या बाजारात आधीपासूनच उपलब्ध असलेल्या मॉडेल्सना दमदार टक्कर देईल.

ओप्पो रेनो 16c माहिती

ऑपरेटिंग सिस्टम: हा ड्युअल ओप्पो फोन अँड्रॉइड 16 वर आधारित ColorOS 16 वर चालतो.

डिस्प्ले: या मॉडेलमध्ये 6.57-इंचाचा AMOLED स्क्रीन असेल, ज्याची कमाल ब्राइटनेस 1400 nits पर्यंत आणि रिफ्रेश रेट 120 Hz पर्यंत असेल.

प्रोसेसर: या डिव्हाइसमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 ऑक्टा कोअर चिपसेट, LPDDR4x रॅम आणि 256 GB UFS 3.1 स्टोरेज वापरले आहे.

कॅमेरा: यात तीन मागील कॅमेरे आहेत: OIS सह 50MP चा मुख्य सोनी LYT-600 सेन्सर, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि 50-मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा. समोरच्या बाजूला 50-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

बॅटरी: फोनमध्ये 7000mAh क्षमतेची बॅटरी मिळेल, जी 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटी: या डिव्हाइसमध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5.4, 4जी एलटीई, ड्युअल बँड वाय-फाय, 5जी, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि जीपीएस सपोर्ट असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *