Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव


Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: स्वप्नांचं शहर असलेल्या मुंबईच्या (Mumbai Crime) झगमगाटामागे दडलेलं एक काळेकुट्ट आणि घृणास्पद वास्तव मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) उघडकीस आणलं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं (युनिट 4) गिरगाव (Girgaon Crime) परिसरातील एका नामांकित आणि प्रतिष्ठित हॉटेलवर छापा टाकून एका हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा (Prostitution Racket) पर्दाफाश केलाय. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्राशी संबंधित दोन अभिनेत्रींची अनैतिक व्यवसायाच्या विळख्यातून सुटका केलीय.

पोलिसांनी सिनेसृष्टीतील (Film Industry) एका प्रसिद्ध महिला मेकअप आर्टिस्टला (Make-Up Artist)) हा घृणास्पद धंदा चालवल्याच्या आणि अभिनेत्रींच्या शरीराची तस्करी (Trafficking Of Actresses Bodies) केल्याच्या आरोपाखाली रंगेहाथ अटक केली आहे. या रॅकेटमध्ये अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं उघडकीस आल्यानंतर मनोरंजन विश्व हादरुन गेलंय. दोन अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री असल्याचं समोर आलंय. 

गिरगावात पोलिसांनी उध्वस्त केलेल्या सेक्स रॅकेटमधून मराठी अभिनेत्रीची सुटका (Marathi Actress Rescued From Sex Racket)

मुंबईतील एका धक्कादायक घटनेतून समोर आलंय की, सिनेसृष्टीत करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रामीण महाराष्ट्रातून शहरात आलेल्या एका होतकरू अभिनेत्रीचं शोषण करण्यात आलंय. मानवी तस्करीविरोधातील एका कारवाईदरम्यान पोलिसांनी एका मराठीतील आघाडीची अभिनेत्री आणि एका बंगाली मॉडेलसह दोन महिलांची सुटका केली आहे. सिनेसृष्टीतील आपल्या ओळखींचा गैरवापर करून होतकरू अभिनेत्रींना वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप असलेल्या एका मेकअप आर्टिस्टवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

एका रात्रीसाठी 2 लाखांचा सौदा 

पोलिसांच्या तपास आणि चौकशीतून या रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिला मेकअप आर्टिस्टनं एका श्रीमंत ग्राहकांशी दोन अभिनेत्रींसाठी एकूण 2 लाख रुपयांचा व्यवहार निश्चित केलेला. या करारानुसार, एका रात्रीसाठी प्रति अभिनेत्री 1 लाख रुपये असा दर ठरवण्यात आला होता. ग्राहकांकडून ती मोठी रक्कम स्वीकारून आणि स्वतःचं भरीव कमिशन वजा करून, ती महिला त्या दोन अभिनेत्रींना गिरगावमधील त्याच हॉटेलवर घेऊन गेली, तिथे दबा धरून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून तिला ताब्यात घेतलं.

पैशांचं आमिष दाखवून मराठी अभिनेत्रीला जाळ्यात ओढलं (Marathi Actress Lured Into Trap With Promise Of Money)

मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटमधून सुटका करण्यात आलेल्या तरुणींपैकी एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे, तर दुसरी बॉलिवूड अभिनेत्री आहे. जिनं विविध बॉलिवूड चित्रपट आणि टेलिव्हिजन सीरिअल्समध्ये छोट्या भूमिका केल्यात. तपासादरम्यान असं समोर आलंय की, सुटका करण्यात आलेली मराठी अभिनेत्री महाराष्ट्रातील एका ग्रामीण भागातील असून, चित्रपटसृष्टीत मोठं यश मिळवण्याच्या उद्देशानं ती मुंबईत आलेली. पण, सध्या तिच्याकडे कोणतंही काम नव्हतं. त्यामुळे अभिनेत्रीच्या आर्थिक अडचणींचा फायदा आरोपी मेकअप आर्टिस्टनं घेतला आणि मोठा रकमेचं आमिष 

मात्र, तिच्याकडे काम नसणे आणि आर्थिक अडचणींचा फायदा घेत, आरोपी मेकअप आर्टिस्टने तिला मोठ्या रकमेचे आमिष दाखवले आणि हळूहळू वेश्याव्यवसायाच्या काळ्या विश्वात ढकलले. चित्रपटसृष्टीतील इतर कोणती बडी मंडळी आणि दलाल या रॅकेटशी संबंधित आहेत, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

नेमकं घडलं काय? (Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket)

काही दिवसांपूर्वी गिरगावातील उच्चभ्रू हॉटेलात मुंबई पोलिसांनी छापा टाकला. या हॉटेलमधून चालवल्या जाणाऱ्या एका कथित हाय-प्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केलाय. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात. छापेमारीत मुंबई पोलिसांनी दोन अभिनेत्रींची सुटका केली. ज्यात एका आघाडीच्या मराठी अभिनेत्रीचा आणि बंगाली चित्रपटसृष्टी, बॉलिवूडमधील छोट्या भूमिकांशी संबंधित असलेल्या दुसऱ्या अभिनेत्रींचा समावेश आहे. या कारवाईदरम्यान, एका संशयित दलालाला अटक करण्यात आली, जो कथितरित्या सेलिब्रिटींशी संबंधित एक मेकअप आर्टिस्ट आहे. पोलीस आता आर्थिक व्यवहारांचा तपास करत आहेत, यात सामील असलेल्यांची चौकशी करत आहेत आणि हॉटेल व्यवस्थापनाच्या संभाव्य भूमिकेची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सुटका करण्यात आलेल्या महिलेची ओळख उघड केलेली नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mumbai Police Rescue Marathi Actress: देह व्यापारातून मराठी अभिनेत्रीची सुटका; गिरगावमधील घटनेने खळबळ, मेकअप आर्टिस्टला रंगेहाथ पकडले, हॉटेलमध्ये काय काय सुरु होतं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *