Beed Crime News : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात सर्व आरोपीवर कारवाई करावी, या मागणीसाठी आज सकाळपासून घुले कुटुंबीयांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर घुले कुटुंबीयांनी आंदोलन स्थगित केलं आहे. विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले तसेच घुले कुटुंबातील महिला देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. तसेच गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीजवळ ठिय्या आंदोलन सुरु केलं होतं.
आश्वासनाप्रमाणे कारवाई न झाल्यास यापुढे आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा
बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात सर्व आरोपीवर कारवाई करावी या मागणीसाठी बुधवारी सकाळपासून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता स्थगित करण्यात आले. विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले तसेच घुले कुटुंबातील महिला देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या तर गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीजवळ ठिय्या सुरु केला होता. आंदोलना दरम्यान मयत घुले यांच्या पत्नीला भोवळ देखील आली त्यानंतर याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी दाखल होत कारवाईचे आश्वासन दिले. यामध्ये सोशल मीडियातून होणारी बदनामी थांबवण्याबरोबरच उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी देखील कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर आश्वासनाप्रमाणे कारवाई न झाल्यास यापुढे आम्ही आंदोलन करणार असल्याचे रमेश घुले यांनी सांगितले.
विलास घुले हत्या प्रकरणात आरोपींनी वापरलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आणि चाकू एसआयटीकडून जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावर ज्या चार चाकी गाडीने आरोपी दाखल झाले होते, ती पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी एसआयटीने जप्त केली आहे. तर ज्या चाकुने विलास घुलेंवर वार करण्यात आला तो चाकू देखील आरोपीच्या शेतातून एसआयटीने जप्त केला आहे. दरम्यान आता विलास घुले हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा एसआयटीच्या हाती लागल्याने या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सैरव सोनवणे याच्यावर देखील आरोप करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सैरव सोनवणे याची एसआयटीकडून चौकशी देखील करण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
विलास घुले हा एक हॉटेल व्यावसायिक होता, दोन गटात भांडण सुरू होते, त्यामुळे तो मध्यस्थी करण्यासाठी गेला होता, त्यावेळी आरोपीने त्याच्यावरच हल्ला केला. धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्यामुळे या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता, या घटनेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.ो
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह