IND vs ENG : ‘तू भागा क्यों नहीं….’, इशान अभिषेकवरच भडकला, टीम इंडियाच्या खेळाडूंचा मैदानातच ड्रामा | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

जगातला नंबर वन टी-20 बॅट्समन बनल्यानंतर पहिल्याच इनिंगमध्ये इशान किशन शून्य रनवर आऊट झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्मासोबत धावताना गोंधळ झाल्यामुळे इशान किशनला त्याची विकेट गमवावी लागली.

'तू भागा क्यों नहीं....', इशान अभिषेकवरच भडकला, टीम इंडियाच्या खेळाडूंचा मैदानातच ड्रामा
‘तू भागा क्यों नहीं….’, इशान अभिषेकवरच भडकला, टीम इंडियाच्या खेळाडूंचा मैदानातच ड्रामा

डरहॅम : जगातला नंबर वन टी-20 बॅट्समन बनल्यानंतर पहिल्याच इनिंगमध्ये इशान किशन शून्य रनवर आऊट झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्मासोबत धावताना गोंधळ झाल्यामुळे इशान किशनला त्याची विकेट गमवावी लागली आहे. मैदानात हा गोंधळ झाल्यानंतर इशान किशन अभिषेक शर्मावर भडकला. ‘मेरी कॉल थी, तू भागा क्यों नहीं’, असं इशान किशन अभिषेकला म्हणाला.

झिरो रनवर आऊट झाला इशान

डरहॅममधल्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर संजू सॅमसन आऊट झाला. 1 रनवर संजू पॅव्हेलियनमध्ये परतला, या धक्क्यातून टीम इंडिया सावरत नाही तोच इशान किशनही रनआऊट झाला.

मिड विकेटच्या दिशेने इशान किशनने शॉट मारला, पण बॉल फिल्डरच्या दिशेने जलद गेला. तोपर्यंत इशान किशन अर्ध्या पिचपर्यंत आला होता, पण नॉन स्ट्रायकर एन्डवरच्या अभिषेकने इशानला मागे पाठवलं, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. विकेट कीपर जॉस बटलरने इशानला रन आऊट केलं.

इशान अभिषेकवर भडकला

इशान किशन रन आऊट आहे का नाही ते पाहण्यासाठी अंपायर थर्ड अंपायरकडे गेले. तेव्हा इशान आणि अभिषेक एकमेकांसोबत बोलत होते. तू भागा क्यों नहीं, मेरी कॉल थी ना, असं इशान अभिषेकला म्हणाला. ‘क्या कर रहा है यार बॉल तो पास होने देता, क्या लग रहा है आऊट है या नॉट आऊट?’, असं अभिषेक म्हणाला. त्यावर क्लोज लग रहा है, असं उत्तर इशान किशनने दिलं. रिप्लेमध्ये इशान किशन क्रीजच्या खूप मागे होता, हे स्पष्ट दिसत होतं.

लागोपाठ दोन इनिंगमध्ये रन आऊट

इशान किशन लागोपाठ दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात रन आऊट झाला आहे. याआधी आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात इशान 12 रनवर रन आऊट झाला होता. तेव्हा तिलक वर्मासोबत रन काढताना इशान गोंधळला. 1 जुलैला इशान किशन आयसीसी टी-20 क्रमवारीमध्ये नंबर वन बॅट्समन बनला आहे. अभिषेक शर्मालाच नंबर वन वरून बाजूला करून इशान टॉपवर पोहोचला. अभिषेक शर्माने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 24 बॉलमध्ये 59 रनची खेळी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *