परदेशातून बंपर कंत्राट! रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील शेअरमध्ये तुफान… 5 वर्षांत 500 टक्के रिटर्न – Marathi News | VA Tech Wabag company got bumper contract from abroad A stock in Rekha Jhunjhunwala portfolio sees a massive surge 500 percent returns in 5 years


Rekha JhuJhunwala Porfolio Share: रेखा झुनझुनावाला यांच्या पोर्टफोलिओतील VA टेक वाबाग (VA Tech Wabag) या शेअरने गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला. या शेअरमध्ये बुधवारी बाजारात 4 टक्क्यांपर्यंत उसळी दिसली. या कंपनीला ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएना येथील एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडून मोठे कंत्राट मिळाले आहे. ही वार्ता धडकताच या कंपनीवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. या वर्षी 2026 मध्ये या शेअरने अगोदरच जवळपास 58 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला आहे. तर याच कालावधीत निफ्टी50 मध्ये घसरण दिसून आली. गुंतवणूकदारांच्या या शेअरवर नजरा खिळल्या आहेत.

VA Tech Wabag करते काय?

VA टेक वाबाग (VA Tech Wabag) ही कंपनी पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापनात काम करते. ही देशातील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीला ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना शहराच्या महापालिका विभागाकडून (Municipal Department MA 31 – Wiener Wasser) डेन्यूब बेटावरील (Donauinsel) पाणी व्यवस्थापनाविषयीची प्रकल्प मिळाला आहे. या योजनेतंर्गत कंपनी पाणी व्यवस्थापनासाठी नवीन प्रकल्पासाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये प्रोसेस इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल सिस्टिम, इन्स्ट्रुमेंटेशन, कंट्रोल सिस्टिम, इमारत देखभाल यांचा समावेश होतो. हा प्रकल्प वर्ष 2030 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या जलशुद्धीकरण प्रकल्पात विविध तंत्रज्ञानाचा वापर होतो. यामध्ये ऑक्सिकरण, ओजोनायझेसन, फिल्ट्रेशन, कार्बन फिल्ट्रेशन आणि युवी डिसइन्फेक्शन या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. यामुळे स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. हे आंतरराष्ट्रीय बंपर कंत्राट कंपनीसाठी फायदेशीर ठरणार आहे.

रेखा झुनझुनावाला यांचा मोठा वाटा

कंपनीत दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांचा मोठा वाटा आहे. मार्च 2026 मधील शेअरहोल्डिंगनुसार, त्यांच्याकडे कंपनीचे 50 लाख शेअर, म्हणजे जवळपास 8.2 टक्के वाटा आहे. रेखा झुनझुनावाला यांची कंपनीतील गुंतवणूक कायम असल्याने गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास कायम आहे. VA Tech Wabag च्या शेअरने बाजारात चांगली कामगिरी बजावली आहे.

शेअर बाजारातील कामगिरी पाहता, VA Tech Wabag च्या शेअरमध्ये गेल्या एका महिन्यात जवळपास 33% जोरदार तेजी दिसली. तर 2026 च्या सुरुवातीला आतापर्यंत जवळपास 58% उसळी दिसून आली. तर त्या तुलनेत निफ्टी 50 या काळात जवळपास 8.5% इतका घसरला. दीर्घ कालावधीत कंपनीने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. गेल्या 3 वर्षांत जवळपास 325% आणि 5 वर्षांत 503% मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. ही केवळ माहिती आहे. कुठल्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *