सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एका विहिरीत पिकअप पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पंढरपूर तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून सर्वजण पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याचे समजते. स्थानिकांच्या मदतीने 6 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या अपघातानंतर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमारे गोरे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी : पालकमंत्री जयकुमार गोरे
अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. मी एसपीशी बोललो आहे असे गोरे म्हणाले. एकाच वेळी इतक्या लोकांचा मृत्यू होणं धक्कादायक आहे. मी प्रशासनाला जाण्याच्या सूचना दिल्या आहे. मी घटनास्थळी जाणार आहे असे गोरे म्हणाले. घटना आताच घडली आहे बचावकार्य सुरु आहे. एसपींना सुचना दिल्या आहेत. नेमका अपघात कसा घडला, याबाबत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहे. या वाहनात 14 लोक होते याची माहिती मिळत आहे.
या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, प्रणिती शिंदेंची माहिती
अतिशय धक्कादायक घटना घडल्याची प्रतिक्रिया सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली. सिद्धनाथाच्या दर्शन घेऊन येताना ती गाडी विहीरीत कोसळली आहे. कसं झालं ते पाहावं लागेल? या घटनेची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. या मार्गावर खूप अपघात होत आहेत. याची दखल घेणं गरजेचं आहे. अपघात झालेल्यांच्या कुटुंबियांना मदत मिळणे गरजेचे आहे. पण गेलेा जीव आता परत मिळणार नाही असे शिंदे म्हणाल्या. या अपघातात मृत झालेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. चौकशी व्यवस्थीत लवकरात लवक झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे.
म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी भाविक आले असताना येथील विहिरीत त्यांचे पिकअप वाहन पडले. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक एका विहिरीत पिकअप गाडी पडल्याने ही दुर्घटना घडली. त्यानंतर, स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मात्र, वाहनातील भाविकांची मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळावर परिस्थिती भीषण असून पिकअपमधील सर्वच भाविक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचलं आहे. अग्निशामक दलाची यंत्रणा बोलावली आहे. प्रांताधिकारी, जिल्हा प्रशासनाची टीम रवाना झाली आहे. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु झालं आहे.
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप