फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिकोत होत आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने मोठ्या दिमाखात सुरू आहेत. असं असताना या स्पर्धेला वादाची किनारही लाभली आहे. या स्पर्धेसाठी सोमालियाचे रेफरी ओमार अर्टान यांना अमेरिकेने वीजा दिला नाही. त्यामुळे अमेरिका आणि फिफावर जोरदार टीका झाली. (Photo: Getty Images)
सोमालियाई रेफरी अर्टान यांना फिफाने वर्ल्डकप स्पर्धेसाठी नियुक्त केलं होतं. पण अमेरिकेत पोहोचताच तपास यंत्रणांनी त्यांना एअरपोर्टवर रोखलं. तसेच काही तास चौकशी केली. त्यानंतर तपास पूर्ण केल्यानंतर वीजा रद्द केला. त्यामुळे अर्टान यांना सोमालियात परतावं लागलं. (Photo: Getty Images)
रेफरी अर्टान यांच्याबाबत फिफाने आता मोठा निर्णय घेतला आहे. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, अर्टान यांना स्पर्धेत भाग घेता आला नसला तरी त्यांना या स्पर्धेचं संपूर्ण मानधन दिलं जाणार आहे. (Photo: Getty Images)
रेफरी अर्टान यांना वर्ल्डकप स्पर्धेत किती मानधन दिलं जाणार? हा प्रश्न आता विचारला जात आहे. रिपोर्टनुसार, याबाबत आता काही स्पष्ट सांगता येणार नाही. कारण रेफरीना वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान किती मानधन दिलं जाणार याबाबत खुलासा केला गेलेला नाही. (Photo: Getty Images)
रिपोर्टनुसार, स्पर्धा संपल्यानंतर रेफरींना स्पर्धेचं मानधन दिलं जाणार आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत 104 सामने होणार आहेत. 51 रेफरी, 88 असिस्टेंट रेफरी आणि 30 व्हिडीओ असिस्टेंट रेफरी यात भाग घेत आहेत. (Photo: Getty Images)




