धक्कादायक! बुलढाण्यात बोगस सोनोग्राफी सेंटरवर कारवाई, गर्भलिंग निदान करताना बनावट डॉक्टरांना रंगेहात अटक


Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यात मेहकर इथं जिल्हा शल्य चिकित्साकांनी मोठी करवाई केली आहे. बोगस सोनोग्राफी सेंटरवर ही कारवाई करण्यात आली आहे. गर्भलिंग निदान करताना दोन बनावट डॉक्टरांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. बंदी असलेल्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने एका घरात हे डॉक्टर गर्भलिंग निदान करत होते. 

मेहकर जवळ असलेल्या परतापुर परिसरात एका घरात दोन बनावट डॉक्टर बंदी असलेल्या सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. यावरुन बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दत्तात्रय बिराजदार यांच्या पथकाने छापा टाकून दोन बनावट डॉक्टरांना गर्भलिंगनिदान चाचणी करताना रंगेहात पकडले आहे. सकाळी सहा वाजेपासून अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई सुरू करण्यात आली होती. दुपारी चारच्या सुमारास बनावट डॉक्टरांनी एका महिलेला गर्भलिंग निदान चाचणीसाठी बोलावलं व याचवेळी छापा टाकून दोन बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. 

मेहकर जवळील परतापुर गावातील अमोल रमेश रसाळ यांच्या घरात बोगस डॉक्टर असलेला अनिल रामदास सोनवणे राहणार हिंगोली हा गर्भलिंग निदान करताना मशीन सहित पकडल्या गेला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीन सह अमोल रमेश रसाळ व बोगस डॉक्टर अनिल रामदास सोनुने यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध मेहकर पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम 61,315, 335, 336. अवैध वैद्यकीय व्यवसाय कलम 33 व पीसीपीएनडीटी कायद्यातील कलम 3, 6, 18, 23 व 25 तसेच बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट कलम चार व पाच नुसार कारवाई करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *