South Director K. Bhagyaraj: प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; सुरुवातीच्या काळातच बिग बी अमिताभ यांच्यासोबत केलेलं काम


South Director K. Bhagyaraj passed away News: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून (South industry) एक दु:खद घटना समोर आली आहे. प्रसिद्ध तामिळ चित्रपट फिल्ममेकर के. भाग्यराज (K. bhagyaraj) यांचं निधन झाले आहे. 73 व्या वर्षी त्यांनी चेन्नई येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर साऊथ सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.  यासह चाहते आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती आहे. 

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (South Director K. Bhagyaraj passed away)

के. भाग्यराज हे केवळ प्रसिद्ध फिल्ममेकर नव्हते, तर कथाकार आणि पटकथा लेखकही होते.  मीडिया रिपोर्ट्सनुसार,  शनिवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. के. भाग्यराज यांना तातडीने चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलला नेण्यात आले होते.  मात्र, योग्य उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.  त्यांच्या निधनानंतर तामिळ सिनेसृष्टीतील एका युगाचा अंत झाला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

 पत्नी अभिनेत्री असून, मुलगा अभिनेता आहे

कृष्णस्वामी भाग्यराज असे  के. भाग्यराज यांचे पूर्ण नाव आहे.  माहितीनुसार, के. भाग्यराज यांचा जन्म 7 जानेवारी 1935 रोजी   तामिळनाडूतील, तिरुपूर जिल्ह्यातील वेल्लाकोईल येथे झाला. त्यांच्या पत्नीचं नाव पूर्णिमा असून, त्या देखील अभिनेत्री होत्या. तसेच त्यांच्या मुलाचे नाव शांतनु असून, ते एक सुप्रसिद्ध अॅक्टर आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, के. भाग्यराज यांना एक मुलगी देखील आहे, तिचं नाव शरण्या असे आहे.

अमिताभ बच्चन यांच्यासोबतही केलेलं काम

के. भाग्यराज यांनी आपल्या कारकि‍र्दीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.   त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1977 साली प्रदर्शित झालेल्या ’16 वयथिनिले’  या सिनेमातून केली. या सिनेमात त्यांनी असिस्टेंड डायरेक्टर म्हणून काम पाहिले. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत 25 सिनेमाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच अमिताभ बच्चन यांच्या ‘आखिरी रस्ता’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1986 साली प्रदर्शित झालेल्या या अॅक्शन क्राईम सिनेमाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.  के. भाग्यराज यांच्या निधनानंतर सिनेसृष्टी तसेच राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘लफडं तर कुणीच..’ गौतमी पाटीलच्या ग्रुपचे कडक नियम, ग्रुपमध्ये काम करण्यासाठी काय आहे अट?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *