तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने


बुलढाणा : राज्यात अन्न व औषध विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी पदभार स्वीकारल्यापासून कारवाईचा धडाकाच पाहायला मिळत आहे. आधी गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांवर कारवाई केल्यानंतर, मुंढेंनी आपला मोर्चा हॉटेल व्यवसायिकांकडे वळवला आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हॉटेल व्यवसायिकांना किचनसंदर्भात नियमांची उजळणी करुन दिली. तर, देवस्थानच्या ठिकाणी असलेल्या पेढा, प्रसाद विक्रीच्या दुकानांवरही आता लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येत आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव शहरात संत गजानन महाराज मंदिर परिसरातील उघड्यावर विक्री केल्या जाणाऱ्या प्रसाद आणि पेढे विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली आहे. त्यामुळे, आता मंदिर परिसरातही तुकाराम मुंढेंचा इम्पॅक्ट जाणवत आहे.

संत श्री गजानन महाराजांच्या शेगावात देशभरातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. येथील मंदिर परिसरात प्रसादाच्या नावाखाली विक्रेते पेढे विक्री करतात. मात्र, येथील हे पेढे भेसळयुक्त असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने बुलढाण्यामधील FDA ने मंदिर परिसरातील दुकानांवर कारवाई केली असून दुकानांमधून गोड पदार्थांचे नमुने घेण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली. या कारवाईनंतर शेगावातील सर्व हॉटेल, पेढे व प्रसाद विक्रेते, पाणीपुरी स्टॉल्स या व इतर उघड्यावर होत असलेल्या खाद्य पदार्थ विक्रेत्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, आपल्या दुकानात किंवा व्यवसायात कुठेही भेसळ होणार नाही याची काळजी देखील घेतली जात आहे. 

भिवंडीत अमेझॉन रिटेलवर धाड

भिवंडी तालुक्याच्या सरवली येथील ‘ॲमेझॉन रिटेल इंडिया’ (Amazon Retail India) या नामांकित कंपनीच्या गोदामावर अन्न व सुरक्षा पथकाने मोठी कारवाई केली. मुदतबाह्य झालेले आणि मानवी आरोग्यास घातक ठरणारे अन्नपदार्थ नष्ट न करता, नागरिकांची दिशाभूल करून ते पुन्हा विक्रीसाठी अन्नसाखळीत वळवल्याचा खळबळजनक प्रकार येथे उघडकीस आला. याप्रकरणी ॲमेझॉन रिटेलच्या फॅसिलिटी मॅनेजरसह दोघांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरवली येथील ‘ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि.’ आणि ‘आर. के. ट्रेडर्स’ यांच्या संगनमताने मुदतबाह्य झालेले अन्नपदार्थ नष्ट न करता ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याची खात्रीशीर माहिती अन्न सुरक्षा पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी मध्यरात्री पथकाने या गोदामावर अचानक धाड टाकून कारवाई केली. या कारवाईमुळे इतरही कंपन्यांमध्ये भीती पसरली आहे. 

हेही वाचा

मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *