Uddhav Thackeray : ऑपरेशन टायगरच्या मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. ते हिंगोली इथं आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. मिधेंच भवितव्य शून्य आहे. काम संपलं की मिधेंना कचऱ्याच्या टोपलीत टाकणार हे लिहून ठेवा, अशी टीका ठाकरेंनी केली. फुटलेले खासदार भाजपकडे जाण्याऐवजी मिंधेकडे का गेले? हे मोठं कोडं आहे. हे म्हणतायेत की ऑपरेशन टायगर आहे. पण तुम्ही टायगरवर ऑपरेशन करु शकत नाहीत. एक पंजा मारला तर सगळी आतडी बाहेर येतील असे ठाकरे म्हणाले. हे ऑपरेशन टायगर नाही तर मला शंका येते की हे ऑपरेशन देवेंद्र असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचे खासदार फोडून अमित शाह यांनी त्यांना मिंधेंकडे पाठवले
देवेंद्र फडणवीस आज ना उद्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरतील म्हणून आताच त्यांचे पंख काप. महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीत पोहोचता कामा नये, म्हणून त्याला तिथल्या तिथं गुंतवूण ठेव, म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शाह यांनी त्यांना मिंधेंकडे पाठवल्याचा माझा समज असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आता निवडणूक थोडीच आहे. मग कशासाठी खासदार फोडले? फोडले ते फोडले पण ते खासदार तुमच्याकडे न घेता तुमचा इकडे एक लाचार गुलाम ठेवला आहे, त्याच्याकडे हे खासदार सरकवले आहेत. म्हणजे उद्या जर प्रश्न आला की पंतप्रधान पदासाठी तुम्ही कोणाला मतदान करणार? तर हे सगळे अमित शाह यांना मतदान करणार असे ठाकरे म्हणाले. ही पुढची व्यवस्था आहे म्हणून शिवसेना फोडत आहेत.
फुटलेले खासदार गुलाम झालेत
फुटलेले खासदार विकासासाठी गेलेत म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील काय? संपूर्ण कर्जमाफी होईल काय? शेतकऱ्यांना पिक विमा मिळेल काय? हे लोक समोर उभे राहून मोदींना हे लोक प्रश्न विचारतील काय? ही धमक शिवसेनेत असताना होती आता हे गुलाम झालेत अशी टीका ठाकरेंनी केली. शिवसेनेचे अस्तित्व आमदार खासदारवर नाही जनतेवर शिवसेनिकांवर असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
न्याय आणि हक्काचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या खांद्याला खांद्या लावून उभा राहिल
शक्तिपीठ महामार्गला ही लोक विरोध करणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. माफी मागायला आलोय तसा एक विश्वास द्यायला आलोय. या ठिकाणी नवा खासदार, नवीन आमदार आणू असेही ठाकरे म्हणाले. तुमच्या न्याय आणि हक्काचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या खांद्याला खांद्या लावून उभा राहिल असे ठआकरे म्हणाले. माझी बांधिलकी तुमझ्याशी आहे असेही ते म्हणाले. साहेब 100 टक्के येतो सांगून, पैसे घेऊन पसार होतात. यांना खासदार केलं नसतं तर कुत्र तरी दाराला आलं असता का? अशी टीका ठाकरेंनी केली. इथल्या गद्दाराने विश्वासघात केला, परत मुलाला पुढे केलं, आम्ही केलं तर घराणेशाही म्हणतात, हा उपमुख्यमंत्री तिकडे त्याचं कारट दिल्लीत खासदार फोडतय असे म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिदेंसह श्रीकांत शिंदेवरही टीका केली.
महत्वाच्या बातम्या:
Video: निकालानंतर नाराज, ओमराजेंनी राजकीय भूमिका सांगितली; उद्धव ठाकरे अन् आदित्य यांच्याबद्दलही बोलले
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा ‘तो’ जुना व्हिडिओ