यानंतर तब्बल 19 वर्षांनी, 2018 मध्ये ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटासाठी या गाण्याचे नव्या धाटणीतील रीक्रिएशन करण्यात आले. मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात तनिष्क बागची यांनी या गाण्याला आधुनिक अरेबिक-पॉप शैलीत नव्याने सादर केले. नेहा कक्कर, ध्वनी भानुशाली आणि इक्का यांच्या आवाजासह नोरा फतेहीच्या दमदार बेली डान्सने हे गाणे जागतिक स्तरावर लोकप्रिय झाले.