चिमुरड्या विहानचा क्रिकेटच्या बॉलसह अंत्यसंस्कार, आई लेकाची बॅट छातीशी लावून रडत होती; सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

खरं तर विहानच क्रिकेट खेळण्याच स्वप्न होतं, पण त्याच्या अपघाती निधनाने हे स्वप्न अधुर राहिलं आहे.

chembur story
chembur story

Mumbai News : मुंबईच्या चेंबूरमध्ये स्कुल बसवर झाड पडून एका चिमुकल्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. विहान श्रीवास्तव असे त्या चिमुकल्याचे नाव होते. आज बुधवारी विहानवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विहानसोबत क्रिकेटचा बॉल ठेवण्यात आला होता. यासोबत विहानची आई बॅटीला कवटाळून बसली होती आणि रडत होती. यावेळी हे दृष्य पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आले होते. खरं तर विहानच क्रिकेट खेळण्याच स्वप्न होतं, पण त्याच्या अपघाती निधनाने हे स्वप्न अधुर राहिलं आहे.

मुंबईच्या स्कुल अपघातात जीव गमावलेल्या विहान श्रीवास्तववर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याच्यासोबत क्रिकेटचा बॉल ठेवण्यात आला होता.खरं तर विहानला क्रिकेटची खूप आवड होती आणि त्याचे स्वप्न व्यावसायिक क्रिकेटपटू बनण्याचे होते, असे विहानच्या एका नातेवाईकाने सांगितले.पण या अपघाताने त्याचे हे स्वप्न अधुर राहिलं.

विशेष म्हणजे विहानची आई जुहीला अजूनही विश्वास बसत नाहीये की तिचा मुलगा या जगात नाही. ती घरात मुलाची क्रिकेट बॅट छातीशी कवटाळून बसली आहे. तसेच ती वारंवार हेच म्हणते आहे, विहान आता खेळायला जाईल.

नेमकं काय घडलं?

चेंबूर येथील 11 नंबर रोडवर एका धावत्या शाळकरी मुलांच्या बसवर अचानक एक भलामोठा वृक्ष कोसळला. त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या भीषण अपघाताच्या वेळी बसमध्ये अनेक शाळकरी मुले उपस्थित होते. झाड कोसळल्यामुळे बसचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला असून, या अत्यंत दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर तब्बल 10 शाळकरी मुले गंभीररीत्या जखमी झाली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही बस टिळकनगरमधील युनिव्हर्सल शाळेची असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

चिमुरड्या विहानचा क्रिकेटच्या बॉलसह अंत्यसंस्कार, आई लेकाची बॅट छातीशी लावून रडत होती; सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *