Ketan Agrawal : चेतन चौधरी आणि सिया गोयलला तीन वर्ष लग्न करायचं नव्हतं, जानेवारीत दोघे राजस्थानला गेलेले; पोलिसांकडून चेतनची बाईक जप्त 


Ketan Agrawal Death Case पुणे : केतन अग्रवाल खून प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.  लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चेतन चौधरीची बाईक जप्त केली आहे. तर, दुसरीकडे पोलीस चौकशीत सिया गोयल आणि चेतन चौधरीबाबत नवी माहिती समोर आली आहे. चेतन आणि  सिया गोयल यांना तीन वर्ष लग्न करायचं नव्हतं, अशी माहिती समोर आली आहे. जानेवारी महिन्यात सिया आणि चेतन राजस्थानला गेल्याची माहिती समोर आली आहे. 

चेतन चौधरीची बाईक जप्त

केतन अग्रवाल खून प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपी चेतन चौधरीची बाईक जप्त केली आहे. चेतन चौधरी लोहगडावर ज्या बाईकनं गेला होता, ती बाईक पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी याशिवाय चेतनच्या हुडी, हेडफोन आणि बाईकची फॉरेन्सिक चौकशी केली.

सिया गोयलला केतन अग्रवालसोबत लग्न करायचं नव्हतं 

पोलीस चौकशीत आरोपी सिया गोयल हिनं केतन अग्रवाल सोबत लग्न करायचं नव्हतं, असं म्हटलं. पोलीस चौकशीनुसार केतन अग्रवालची हत्या झाल्यानंतर दुसऱ्या लग्नासाठी विचार करण्यासाठी तीन वर्षांचा वेळ मिळेल, असं सियाला वाटत होतं.  चेतन चौधरीला देखील सिया गोयलसोबत लग्न करण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा वेळ मिळावा असं वाटत अशल्याचा पोलिसांना संशय आहे.  केतन अग्रवालसोबत ठरलेलं लग्न मोडलं तर कुटुंबात आणि समाजात बदनामी होईल, अशी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना भीती होती. या बदनामीपासून वाचण्यासापासून केतन अग्रवालच्या खूनाचा कट रचला.  

केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचं लगेच फेब्रवारीत ठरलं होतं. त्यापूर्वी सिया आणि चेतन उदयपूरला फिरण्यासाठी गेले होते. पोलिसांचिया माहितीनुसार चेतन चौधरी आणि सिया गोयल जानेवारीत राजस्थानला गेले होते, ते पाच दिवसांच्या ग्रुप ट्रिपवर होते. चेतन चौधरी मूळचा राजस्थानचा असल्याचं समोर आलं आहे.  

पोलिसांनी दोघांच्या नात्यांची टाइमलाईन, प्रवासाचं रेकॉर्ड आणि इतर पुराव्यांची तपासणी, यासह कटाचा घटनाक्रम जुळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.  या प्रकरणी पोलीस त्यांनी  जमवलेल्या पुराव्यांची पडताळणी करत आहे.  

चेतन आणि सियाचं कृत्य पाहणाऱ्यांनी समोर यावं: विशाल अग्रवाल

लोहगडावर केतन अग्रवालची हत्या झाली. तेव्हा जे घटनास्थळी हजर होते, ज्यांनी केतनला दरीत ढकलून देताना पाहिलं, त्यांनी पुढं येण्याचं आवाहन विशाल अग्रवाल यांनी केलं आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरीचे हे कृत्य समोर आणण्यासाठी त्या साक्षीदारांनी पुढं यावं. त्यांना कोणताही त्रास होऊ देणार नाही, असं मी त्या साक्षीदारांना आश्वस्त करतो,असं केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी केली. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *