ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं


ठाणे : जिल्ह्यातील शहापूर (Thane) तालुक्यात प्रेमसंबंधातून (love story) घडलेल्या एका खळबळजनक हत्येचा ठाणे ग्रामीण पोलिसांनी उलगडा केला आहे. विवाहित महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळे तिच्या पतीचा काटा काढण्यासाठी प्रियकराने थेट हत्येचा कट रचला होता. विशेष म्हणजे, हत्या कशी करायची, पुरावे कसे नष्ट करायचे आणि पोलिसांपासून कसे वाचवायचे याचे नियोजन आरोपीने OTT प्लॅटफॉर्मवरील (OTT platform) गुन्हेगारी मालिकांमधून शिकल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.

शहापूर तालुक्यातील खरपत क्रमांक 1 गावातील 52 वर्षीय वामन निरगुडा हे शेतात काम करत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना संशयास्पद वाटत असली तरी ठाणे ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. तपासादरम्यान 35 वर्षीय धनेश मेंगाळ यानेच ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचे मृताच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. या नात्यात पती अडथळा ठरत असल्याने त्याला संपवण्याचा निर्णय आरोपीने घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. 

आरोपीने हत्या करण्यापूर्वी अनेक दिवस OTT वरील गुन्हेगारी मालिका पाहून नियोजन केले होते. हत्या कोणत्या पद्धतीने करावी, घटनास्थळी पुरावे कसे टाळावेत आणि गुन्ह्यानंतर पोलिसांच्या नजरेत न येण्यासाठी काय करावे, याचा अभ्यास करूनच त्याने हा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर आरोपी काही काळ फरार होता. मात्र, ठाणे ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे त्याचा माग काढत त्याला अटक केली. सध्या आरोपीकडे अधिक चौकशी सुरू असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. प्रेमसंबंधातून घडलेल्या या हत्येने शहापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, OTT वरील गुन्हेगारी मालिकांचा गैरवापर करून गुन्ह्याचे नियोजन केल्याचा हा प्रकार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा

केतनला मारण्याचा नाही तर गंभीर जखमी करण्याचा होता प्लॅन, सिया आणि चेतनमध्ये नेमकी काय झाली होती चर्चा? धक्कादायक माहिती समोर 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *