डहाणूत भर बाजारात बंदुका झळकल्या, पोतं भरून सोनं नेलं… – Marathi News | Palghar armed daylight robbery at laxmi jewellers indahanu gold loot video viral


पालघरमधून मोठी बातमी समोर आली आहे. बंदुकीचा धाक दाखवून भरदिवसा सोन्याच्या दुकानात दरोडा टाकल्याचे समोर आले आहे. डहाणूच्या इराणी नगर परिसरातील लक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान भरदिवसा लुटल्याचे समोर आले आहे. हातात शस्त्र घेऊन आलेल्या तिघांनी पोत्यात भरून सोन नेल्याचे समोर आले आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे डहाणूसह परिसरात सराफा दुकानदारांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचं दुकान लुटलं

पालघरच्या डहाणूतील या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. यात 3 दरोडेखोर बंदुकीच्या धाकावर सोन्याचे दुकान लुटत असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण डहाणू परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आता डहाणू पोलिसांनी आणि पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. स्थानिकांकडून या आरोपींवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.

पोत्यात भरून दागिने नेले

डहाणूतील सोन्याच्या दुकानावरील दरोड्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. यात दिसत आहे की, तीन दरोडेखोर येतात. यातील एकाच्या हातात बंदूक आहे. एकजण बंदुक घेऊन दारात उभा राहतो, दुसरे दोघेजण दुकानात जातात आणि मालकाला धमकावून सोन्याचे दागिने एका पोत्यात भरण्यास सुरुवात करतात. हे चोरचे दुकानातील मोठ्या प्रमाणात दागिने पोत्यात भरतात. या सोन्याची किंमत लाखोंमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

दरोड्याचा व्हिडिओ व्हायरल

दुकानातील सगळे दागिने पोत्यात भरल्यानंतर दोघेजण बाहेर येतात आणि आपल्या बंदुक असणाऱ्या तिसऱ्या सहकाऱ्यासोबत घटनास्थळावरून पसार होतात. या घटनेने डहाणूसह परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. मात्र दरोडा टाकताना हे आरोपी पूर्णपणे तयारीत आले होते, चोरट्यांची कापडाने आपले तोंड झालेले होते. त्यामुळे या चोरट्यांचे चेहरे कॅमेऱ्यात कैद झालेले नाहीत. डहाणूतील दरोड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. यावर लोकांना आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *