Ashadhi Ekadashi 2026: यंदाची देवशयनी एकादशी 4 राशींचं भाग्य घेऊन येतेय! शुभ योगांचा महासंगम, पैसा, नोकरी, प्रेमात नशीब फळफळणार…


Ashadhi Ekadashi 2026:  विठ्ठलभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस म्हणजे देवशयनी किंवा आषाढी एकादशी लवकरच येतेय. देवशयनी एकादशीला आषाढी एकादशी, महाएकादशी किंवा हरिशयनी एकादशी असेही म्हटले जाते. हिंदू धर्मात या एकादशीला अत्यंत महत्त्व आहे. या दिवसापासून भगवान श्रीविष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. पुढील चार महिने भगवान विष्णू योगनिद्रेत असतात आणि प्रबोधिनी (देवउठणी) एकादशीला जागृत होतात. वैदिक पंचांगानुसार, या वर्षीची देवशयनी एकादशी 25 जुलै रोजी आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही या वर्षीची देवशयनी एकादशी खूप विशेष असेल. यंदा 4 राशीच्या लोकांना या दिवसाचा विशेष लाभ होईल. त्यांच्या जीवनात सुख आणि समृद्धीत वाढू होऊ शकते…कोणत्या असतील त्या भाग्यशाली राशी?

देवशयनी एकादशी 4 राशींचं भाग्य घेऊन येतेय! शुभ योगांचा महासंगम..(Ashadhi Ekadashi 2026)

वैदिक पंचांगानुसार, देवशयनी एकादशी 25 जुलै रोजी येते, जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत जातात आणि चातुर्मास सुरू होतो. देवशयनी एकादशीच्या दिवशी, भगवान विष्णूची पूर्ण विधी आणि उपवासाने उपासना केली जाते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात. या वर्षीची देवशयनी एकादशी ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही खूप विशेष असेल. यावर्षी, ही एकादशी 4 राशींसाठी अत्यंत शुभ असेल, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुख आणि समृद्धी वाढेल आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. 

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, देवशयनी एकादशीच्या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींना शुभ फळे मिळू शकतात. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात, गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो, करिअरमध्ये प्रगती होऊ शकते आणि वैवाहिक सुखात वाढ होऊ शकते.

वृषभ (Taurus)

ज्योतिषशास्त्रानुसार,देवशयनी एकादशीच्या दिवशी वृषभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये यश आणि कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळू शकतात. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि बचतीत वाढ होऊ शकते.

कन्या (Virgo)

ज्योतिषशास्त्रानुसार, देवशयनी एकादशीचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरू शकतो. तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला मित्र आणि प्रियजनांकडून पाठिंबा मिळू शकतो.

तूळ (Libra)

देवशयनी एकादशीच्या दिवशी तूळ राशीच्या व्यक्ती अनेक यश मिळवू शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ कामाच्या ठिकाणी मिळू शकते, ज्यामुळे सकारात्मक परिणाम दिसून येतील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन अधिक सुसंवादी होऊ शकते.

हेही वाचा :

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *