“सरकारची कालची भूमिका पाहून आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. जालियनवाला बागेत जनरल डायरने गोळ्या घातल्या. इथे भाजपच्या जनरल कायरने लाठीमार केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. लहान लहान मुलींचा आक्रोश पाहिला. ज्यांना मूलबाळ नसल्यामुळे किंवा ज्याची मुलं आहेत, ती परदेशात सुरक्षित असल्यामुळे त्यांना आमच्या भारतातल्या मातीतल्या मुलांचं दु:ख अजिबात कळणार नाही. कालच दिवस हा भारतीय लोकशाहीतला काळा दिवस आहे. 20 जुलै हा दिवस यापुढे डरपोक दिवस म्हणून साजरा करावा” अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारलेलं की, काल तुम्ही बोललेलात की खासदार ग्राऊंडवर दिसतील. त्यावर राऊत यांनी उत्तर दिलं. “डरपोक हा शब्द पोलिसांनी ज्या प्रकारचा अत्याचार केसा, हल्ला केला. ज्यापद्धतीने लहान मुलांना मारलं हा डरपोकपणा आहे. सरकार लहान मुलांना, विद्यार्थ्यांना घाबरलय. हुकूमशाहीप्रमाणे ते आंदोलन चिऱडून टाकण्याचा प्रयत्न करतायत. ग्राऊंडवर आम्ही सर्व होतो. काल आम्ही ताबडतोब सोनम वांगचूक यांना भेटायला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली” असं संजय राऊत म्हणाले.
त्यांचा घसा, कंठ पूर्णपणे बिघडलेला आहे
सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादीचे आठ खासदार ग्राऊंडवर दिसले नाहीत, यावर संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात मोठं आंदोलन झालं आहे. त्यांच्या राष्ट्रवादीने सुद्धा आंदोलन केलं. सुप्रिया सुळे आजारी आहेत. त्यांचा घसा, कंठ पूर्णपणे बिघडलेला आहे. डॉक्टरांनी त्यांना 10 ते 12 दिवस घशावर ताण देऊ नका असं सांगितलं आहे” “विरोधी पक्षांनी आंदोलन ताब्यात घेतलं पाहिजे. आम्ही स्वत: मुंबईत मोठं आंदोलन केलं. सगळ्यात मोठं आंदोलन दादर शिवाजी पार्कमध्ये झालं.हे महाराष्ट्रातील, देशातील मोठं आंदोलन असू शकतं. देशपातळीवर हे आंदोलन घेऊन जावं लागेल” असं संजय राऊत म्हणाले.
काल क्रांतीची ठिणगी पेटली
“काल क्रांतीची ठिणगी पेटली. वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी कालच येणार होते. पण दिल्लीत जितका फोर्स लावला, त्यापेक्षा जास्त शंभू बॉर्डरवर लावला. अन्यथा शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होणार होते” असं संजय राऊत म्हणाले.