घरच्या साफसफाईत सापडले 20 वर्षांहून जुने SBIचे पासबुक; आजोबांच्या खात्यातील नोंदी पाहून कुटुंब चक्रावले | बिझनेस


Last Updated:

Bank Passbook: घराची साफसफाई करताना एका तरुणाला आजोबांचे 20 वर्षांहून जुने SBI पासबुक सापडल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

News18
News18

नवी दिल्ली: घराची साफसफाई करताना अनेकदा जुन्या वस्तू, कागदपत्रे किंवा आठवणी सापडतात. मात्र एका तरुणाच्या बाबतीत अशीच साफसफाई आर्थिकदृष्ट्या फायदा देणारी ठरली. घरातील जुन्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून त्याला स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे 20 वर्षांहून अधिक जुने पासबुक सापडले. ही घटना सोशल मीडियावर समोर आल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार हे पासबुक त्या तरुणाच्या दिवंगत आजोबांचे होते. त्या बँक खात्यात 1 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा असू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पूजा नावाच्या एका तरुणीने या घटनेचा स्क्रीनशॉट शेअर केला. तिच्या पोस्टनुसार, घर साफ करताना एका तरुणाला जुन्या कागदांमध्ये हे पासबुक सापडले. पहिल्या नजरेतच ते पासबुक सुमारे 20 ते 24 वर्षे जुने असल्याचे दिसून आले. संबंधित तरुणाने ते वडिलांकडे दिल्यानंतर त्यांनी सांगितले की, हेच पासबुक कुटुंब अनेक वर्षांपासून शोधत होते. पासबुकमध्ये चार अंकी जुना खाते क्रमांक आणि 2003 मधील व्यवहारांची नोंद असल्याचेही दिसून आले. मात्र या दाव्यांची सत्यता न्यूज 18 मराठीने तपासलेली नाही.

आता हे पैसे मिळू शकतात का?

ही घटना व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी एकच प्रश्न विचारला एखादे बँक खाते अनेक वर्षे निष्क्रिय (Inactive) असले, तरी त्यातील पैसे परत मिळू शकतात का? तसेच खातेदाराचा मृत्यू झाला असल्यास त्याच्या कायदेशीर वारसांना ती रक्कम मिळू शकते का? यावर अनेक नेटिझन्सनी माहिती देताना सांगितले की, केवळ व्यवहार बंद झाल्यामुळे खात्यातील रक्कम नष्ट होत नाही.

सोशल मीडियावरील अनेक युझर्सनी सर्वप्रथम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पोर्टलवर संबंधित खात्याची माहिती तपासण्याचा सल्ला दिला. त्यानंतर खालील कागदपत्रांसह संबंधित SBI शाखेत संपर्क साधण्याचेही सुचवण्यात आले आहे.

1)मूळ पासबुक

2)खातेदाराचा मृत्यू दाखला (जर खातेदाराचे निधन झाले असेल)

3)कायदेशीर वारस असल्याचा पुरावा

4)इतर आवश्यक ओळखपत्रे

5)जुनी खातीही निकाली काढता येतात

नेटिझन्सच्या मते आवश्यक कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अनेक वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांबाबतही प्रक्रिया पूर्ण करून रक्कम मिळवणे शक्य असते. त्यामुळे अशा प्रकारचे जुने पासबुक किंवा खाते आढळल्यास वेळ न दवडता संबंधित बँकेशी संपर्क साधणे आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे, हाच सर्वात योग्य मार्ग असल्याचे सांगितले जात आहे.

मराठी बातम्या/मनी/

घरच्या साफसफाईत सापडले 20 वर्षांहून जुने SBIचे पासबुक; आजोबांच्या खात्यातील नोंदी पाहून कुटुंब चक्रावले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *