मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंच्या (Tukaram mundhe) करवाईचा धडाका सुरुच असून गेल्याच आठवड्यात त्यांनी हॉटेल व्यवसायिकंसाठी नियमावली सादर करत कारवाईला सुरुवात केली होती. तत्पूर्वी पनीर विक्रेते, बेकरी व्यवसायिकांनाही आपल्या कामाचा धाक दाखवत भेसळयुक्तांवर कारवाईचा बडगा उगारला होता. आता, दूध सम्राटांकडे त्यांनी आपली नजर वळवली असून तुकाराम मुंढेंचा दूध (Milk) विक्रेत्यांवर स्ट्राईक केला जात आहे. त्याच अनुषंगाने नियमावली सादर करण्यात आली असून ‘सेव्ह फुड, सेव्ह ड्रग’ ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. ग्राहकांच्या ताटात दूध, दुग्धजन्य पदार्थ पोहोचण्यापर्यंतची निर्बंध स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.
राज्यात ‘सेव्ह फूड सेव्ह ड्रग’ ही मोहीम आता आपण हाती घेतली आहे, आपल्या अन्नात सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे दूध. दूध उत्पादकांची बैठक मी घेतली होती, त्यांना प्रेझेंटेशन दाखवलं असून दूध प्रोडक्ट इकोसिस्टम असली पाहिजे. फार्म टू प्लेट प्रोसिजर आपल्याला बघावी लागेल, असे तुकाराम मुंढेंनी म्हटलं. दुधातली भेसळ, कृत्रिम दूध या सगळ्या संबंधी गाईडलाइन्स दिल्या आहेत. त्यासंदर्भातील आदेश आपण दिले आहेत, दूध उत्पादकांना पॅकर्सपासून सेलर पर्यत 8 प्रकारचे नियम सगळ्यांना लागू आहेत, अशी माहितीही तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषदेत दिली. दूध संललन केंद्र, दूध कुलिंग सेंटर, किरकोळ विक्रेते, बल्क दूध विक्री करणारे, पनीर, खवा, लोणी, क्रीम, चीज, आयस्क्रीम विक्रेते या सगळ्यांना हे नियम लागू असतील, असेही मुंढेंनी म्हटले.
हॉटेल व्यवसायिकांसाठी आपण सुरू केलेल्या मोहिमेत असंही आढळून आलं की, अनेकांनी नियमानुसार बदल केले आहेत. मात्र, काही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये पेस्ट कंट्रोल केलं असं सर्टिफिकेट दाखवतात. मात्र, प्रत्यक्षात पेस्ट कंट्रोल काही हॉटेलमध्ये केलं नव्हतं, त्यांचे लायसन्स रद्द करण्याचे काम आम्ही केलं आहे. त्यामुळे, मला फक्त सर्टिफिकेट नको आहेत, काम न केल्यास थेट लायसन्स रद्द केले जातील, अशा इशाराच तुकाराम मुंढेंनी दिलाय.
संकलन ते विक्री सर्व टप्प्यावर आदेश लागू
महाराष्ट्र शासनाने दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या संपूर्ण पुरवठा साखळीत अन्न सुरक्षा व गुणवत्ता मानकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यव्यापी सर्वकष अनुपालन आदेश जारी केला आहे. हा आदेश दूध संकलन शीतकरण प्रक्रिया, पॅकेजिंग, साठवणूक, वाहतूक वितरण आणि विक्री या सर्व टप्प्यावर लागू असेल, व्यवसाय, चालकासाठी बंधनकारक आहे, असे तुकाराम मुंढेंनी म्हटले. आदेशाचा उद्देश केवळ भेसळ रोखणे नसून सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण वाढ करणे, प्रामाणिक दुध व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात आधुनिक अन्न सुरक्षा संस्कृती विकसित करणे हा आहे. राज्यभर करण्यात आलेल्या तपासण्या, निरीक्षण, नमुना विश्लेषणे अंमलबजावणी कारवाईतून दूध पुरवठा साखळीच्या विविध टप्यावर काही गंभीर त्रुटी सातत्याने निदर्शनास आल्या. या त्रुटी केवळ जिल्ह्यापूत्या नाही संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये एकसमान अनुपालन व्यवस्था आवश्यक आहे, असेही मुंढेंनी म्हटले.
प्रशासनाच्या निरीक्षणात पुढील अनियमितता आढळून आल्या
दूधामध्ये पाण्याची भेसळ
कृत्रिम (Synthetic) दूध तयार करून विक्री,
युरिया, डिटर्जेंट, कॉस्टिक सोडा, स्टार्थ, ग्लुकोज मेलामाइन इत्यादी रसायनांचा वापर
मिल्क फॅट SNF मानकांचे उल्लंघन
शीतसाखळीचे पालन न करणे.
विनापरवाना अथवा विना नोंदणी व्यवसाय
चुकीचे लेबलिंग व ग्राहकांची दिशाभूल
हेही वाचा
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग