Gaurav More Hindi Webseries: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत


Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातील गौरव मोरे (Gaurav More) हा त्याच्या कॉमेडीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलाय. अगदी कमी काळात त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली .नंतर हास्यजत्रा सोडल्यामुळे गौरव चर्चेत राहिला. ‘चला हवा येऊ द्या’ च्या दुसऱ्या पर्वाचा झळकल्यानंतर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होता. त्याच्या नवीन घराची आणि लग्नाची ही चर्चा रंगलेली.आता ‘हास्यजत्रेतल्या गौरव मोरेने हिंदी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवला असून अर्शद वारसी आणि सुनील ग्रोवरच्या ‘प्रीतम ॲन्ड पेड्रो ‘ या वेब सिरीजमध्ये झळकलाय. त्याची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.  मराठी कॉमेडी शोमधून आता हिंदी वेब सिरीजमध्ये गौरवने झेप घेतल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

गौरव मोरेची राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये एन्ट्री

गौरव मोरेची एक वेब सिरीज सध्या जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झालीय. गौरवणे सोशल मीडियावर वेब सिरीजच्या संपूर्ण टीमसोबत फोटो पोस्ट करत त्याच्या वेब सिरीजच्या रिलीज डेटबाबत चाहत्यांना सांगितलं. राजकुमार हिरानी यांची ही वेब सिरीज असून सध्या या वेब सिरीस ची मनोरंजनसृष्टीत मोठी चर्चा रंगली आहे. गौरवच्या या पोस्टवर हास्य जत्रेतील अनेक विनोदविरांनी कमेंट्स करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. अभिनेत्री विशाखा सुभेदारने, ‘आईच्या गावात… हा माणूस कसला आहे रे… प्रचंड हुशार…आणि निरीक्षण क्षमता, बुद्धी सगळंच ओतप्रोत…कमालीची स्वतःची हुशारी…स्वतचं टायमिंग…कॉपी करणं किती सहज जमात त्याला…पण तरीही जेव्हा स्वतःचं पात्र निभावतो तेव्हा कॉपीचा गंध नसतो.’ अशी कमेंट करत गौरवचं कौतुक केलं आहे.

प्रीतम अ‍ॅन्ड पेड्रो’ वेब सिरीज नेमकी कशावर ?

प्रीतम अँड पेड्रो ही वेब सिरीजमध्ये पेड्रोची भूमिका अर्शद वारसीनं साकारली आहे.  क्राईम ब्रांचमध्ये काम करणारा पेड्रो एक पोलीस अधिकारी असतो. पण जेव्हा एका राजकारण्याच्या पत्नीचा फोन चोरीला जातो आणि तो सापडत नाही, त्यावेळी त्याची सायबर क्राईम विभागात बदली होते. पण त्याला क्राइम ब्रांचमध्ये परत यायचं असतं. सायबर गुन्हेगारी मध्ये त्याला फारसा रस नसतो. 

 

 

View this post on Instagram

 

दुसरीकडे, प्रीतम हा व्हॅक्यूम क्लीनरचा विक्रेता आहे, पण तो एक हुशार हॅकरसुद्धा आहे. प्रीतम आणि पेड्रो यांची भेट कशी होते नंतर राजकारण्याचा मुलगा किडनॅप होतो, असे अनेक ट्विस्ट या वेब सिरीजमध्ये येतात. अभिनेता विक्रांत मेस्सी, कथेमध्ये कसा प्रवेश करतो? हे वेब सीरिज पाहतानाच प्रेक्षकांना कळेल. या सीरिजमध्ये गौरव मोरेची नेमकी भूमिका काय आहे, हेसुद्धा पाहणं चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरतोय.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *