IND vs ENG 2nd T20I : पहिली मॅच पाण्यात गेली, दुसऱ्या मॅचवरही संकट; मँचेस्टरमधून सर्वात मोठी अपडेट, किती वाजता सुरू होणार मॅच?


India vs England 2nd T20I Manchester Weather Forecast : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला सामना डरहम येथे खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर 189 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे सामन्यात एकही चेंडू टाकला जाऊ शकला नाही आणि सामना अखेर रद्द करावा लागला. या निराशाजनक सुरुवातीनंतर आता दुसऱ्या सामन्याबाबतही चाहत्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे.

मँचेस्टरमध्ये पावसाची शक्यता किती?

शनिवार, 4 जुलै रोजी मँचेस्टरच्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड (Emirates Old Trafford) मैदानावर हा दुसरा सामना खेळवला जाणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, चाहत्यांना पुन्हा एकदा हिरमोड सहन करावा लागू शकतो. अ‍ॅक्यवेदरच्या अहवालानुसार, मँचेस्टरमध्ये शनिवार (4 जुलै) रोजी दिवसभर पावसाची शक्यता 16 ते 20 टक्क्यांपर्यंत आहे. जरी हा पाऊस सामना पूर्णपणे रद्द करण्याइतका नसला, तरी सामन्यात व्यत्यय आणू शकतो ज्यामुळे षटकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, संपूर्ण सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण राहील, ज्याचा फायदा खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना नक्कीच मिळेल. सामना भारतीय वेळनुसार 7 वाजता सुरू होईल.

सॅमसनच्या फॉर्मवर टांगती तलवार

दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय संघासमोर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, युवा आणि नवोदित खेळाडू वैभव सूर्यवंशी याला प्लेइंग इलेव्हनमध्ये पदार्पणाची संधी मिळणार का? जर वैभवला संघात स्थान दिले, तर कोणाला बाहेर बसावे लागणार, यावर सध्या खलबतं सुरू आहेत. वैभव सूर्यवंशीच्या वाढत्या मागणीमुळे वरिष्ठ खेळाडू संजू सॅमसन याच्यावर चांगली कामगिरी करण्याचे प्रचंड दडपण आले आहे. या दौऱ्यात सॅमसन आतापर्यंत सपशेल अपयशी ठरला आहे. पहिल्या सामन्यात सॅमसनने 7 चेंडूंत केवळ 1 धाव केली, आणि त्याच्या फलंदाजीत तो आत्मविश्वास दिसून आला नाही. सीम आणि स्विंग होणाऱ्या खेळपट्ट्यांवर त्याची तांत्रिक कमकुवतपणा पुन्हा एकदा समोर येत आहे.

भारतीय टी-20 विश्वचषक विजयाचा भाग असलेल्या सॅमसनला भविष्यासाठी मोठी संधी मानले जात होते. मात्र, आता वैभव सूर्यवंशीसारखा विस्मयकारक तरुण फलंदाज समोर आल्यामुळे सॅमसनसाठी संघात चुकांना अजिबात वाव नाही. दुसरीकडे, अभिषेक शर्माने गेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये 49 आणि 59 धावांची खेळी करून आपले स्थान मजबूत केले आहे, ज्यामुळे सॅमसनवरील दबाव अधिकच वाढला आहे.

हे ही वाचा –

IND vs ENG 2nd T20I : टीम इंडिया मँचेस्टरला पोहोचली, BCCIने वैभव सूर्यवंशीचा ‘तो’ व्हिडीओ पोस्ट करतातच चाहते भडकले, नको नको ते बोलले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *