अनवाणी पायाने चिखल तुडवत विराट आणि अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या दरबारात; गुरुपौर्णिमे आधीच घेतले आशीर्वाद – Marathi News | Virat Kohli Anushka Sharma Walk Barefoot Through Mud After Seeking Premanand Maharajs Blessings


बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि चर्चित जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांना एकत्र पाहणे त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच आनंदाचा क्षण असतो. आता त्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विराट आणि अनुष्का चिखल असलेल्या रस्त्यावरुन अनवाणी चालताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी दोघांचे कौतुक केले आहे.

अनुष्का शर्मा नुकताच पती विराट कोहली सोबत वृंदावन येथील नीम करोली बाबांच्या आश्रमात दर्शनासाठी गेली होती. आश्रमातून बाहेर निघताचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आश्रमात दर्शन घेतल्यानंतर दोघे अनवाणी बाहेर पडताना दिसले. संपूर्ण रस्त्यावर चिखल होता. तरीही दोघे कोणताही विचार न करता अनवाणी पायाने, अत्यंत साध्या वेषात बाहेर पडताना दिसत होते. दोघांनी कॅज्युअल कपडे घातले होते.

अनुष्का शर्माचा लूक

व्हिडीओमध्ये अनुष्काने पांढरा आणि निळ्या रंगाची प्रिंट असलेला सलवार सूट घातला आहे. तिने डोक्यावर त्याच रंगाची ओढणी घेतली आहे आणि तोंडावर निळ्या रंगाचा मास्क लावलेला दिसत आहे. तर दुसरीकडे विराटने चॉकलेटी रंगाचा शर्ट आणि क्रीम रंगाचा पँट घातली आहे. त्यानेही तोंडाला निळ्या रंगाचा मास्क लावला असून कपाळावर टिळा लावलेला दिसत आहे. दोघे एकमेकांचा हात धरून चालताना दिसले.

प्रेमानंद महाराजांकडून गुरु दीक्षा

अनुष्का आणि विराट हे लंडनमध्ये राहतात. तरीही भारतात आल्यानंतर वारंवार वृंदावन येथील प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी येतात. या जोडप्याने प्रेमानंद महाराजांकडून गुरु दीक्षा घेतली आहे. त्यानंतर दोघांना गळ्यात तुळशीची कंठी माळ घालून अनेकदा दिसले आहेत. सध्या त्यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातून बाहेर पडतानाचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी विराट आणि अनुष्काने सीजेपीच्या आंदोलनाबाबत मौन बाळगल्यामुळे सुनावले आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *