Megha Dhade on CJP Protest: नीट पेपरफुटी विरोधात दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP Protest) आंदोलनाचा सोमवारी कडेलोट झाला. ‘दिल्ली चलो’ रॅली अंतर्गत शेकडो विद्यार्थ्यांचे लोंढे संसदेवर धडकले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी एकवटलेल्या शेकडो विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलन पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईनंतर संपूर्ण देशभरातून सरकार विरोधाचा रोष वाढतोय. मनोरंजन सृष्टीतील अनेकांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला असला तरी काही जणांनी विरोधही केलाय. मराठी अभिनेता सौरभ गोखले नंतर बिग बॉस मराठीच्या पहिला पर्वाची विजेती आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मेघा धाडेने (Megha Dhade) केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर तिने तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. ‘
सोशल मीडियावर तिने अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये कॉकरोच जनता पार्टीतील (CJP) आंदोलन कशी पोकळ आहेत अशा स्वरूपाची मांडणी करण्यात आली आहे. एका व्हिडिओवर मेघा धाडेने ‘मी झुरळांऐवजी सिंहाला पाठिंबा देणारी आहे ‘ अशी कमेंट केली. या व्हिडिओत पंतप्रधान मोदींसह भाजपमधील अनेक नेत्यांचे फोटो होते. मेघा धाडेने मांडलेल्या तिचा आक्रमक भूमिकेवरून चर्चा होतेय.
काय म्हणाली मेघा धाडे?
बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीजनची विजेती आणि अभिनेत्री मेघा धाडे कायमच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर व्यक्त होताना दिसते. नुकत्याच जंतर-मंतरवर घडलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला जोरदार विरोध करत तिने सरकारच्या मागे राहण्याची भूमिका घेतली. सोशल मीडियावर तिने अनेक व्हिडिओ शेअर केले आहे तर ज्यामध्ये कॉक्रोचे जनता पार्टीच्या विरोधाचा सूर दिसून येतोय. तिने शेअर केलेल्या एका पोस्टवर ‘भाजपला विरोध करणे म्हणजे देशद्रोही नाही, पण देशद्रोहींना पाठिंबा देऊन भाजपला विरोध करणे देशद्रोही आहे.’ असा मजकूर लिहिलेला आहे. अनेक व्हिडिओमध्ये आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर लाठीचार्ज झाला असं सांगणाऱ्या पोस्ट आहेत. तिने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये ‘मी पंतप्रधानांच्या मागे उभी आहे ‘ असं लिहिलेलं आहे.



आपल्या बेधडक आणि रोखठोक बोलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेघाने आपली भूमिका आपला पाठिंबा सरकारला असल्याचं या पोस्टमधून सांगितलं आहे.
कोण आहे मेघा धाडे ?
बिग बॉस मराठीचा पहिला परवाची बीजेपी ठरलेली अभिनेत्री मेघा धाडे हिने अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. मेघाने भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला होता.