मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांची आज पहिलीच जयंती. सहा महिन्यांपूर्वी अजित पवारांचे विमान दुर्घटनेत अकाली निधन झाले. 28 जानेवारीच्या सकाळी सकाळी अवघ्या महाराष्ट्राची झोप उडवून देणारी घटना माध्यमांतून समोर आली, ती म्हणजे अजित पवारांचे निधन. बारामतीजवळ अजित दादांचे विमान क्रॅश झाले अन् अवघा महाराष्ट्र सुन्न झालं, सोशल मिडिया भावूक झाला, अनेकांच्या डोळे पाणावले, बडे नेतेही धाय मोकलून रडू लागले. आज 22 जुलै रोजी अजित पवारांचा सर्वत्र वाढदिवस साजरा केला जायचा. मात्र, आज त्यांची जयंती साजरी होत असल्याने अनेक नेते भावूक झाले आहेत, अनेक नेत्यांनी (Dilip sopal) दांदांच्या आठवणी जागवल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची आठवण सांगत आपल्या राजकीय प्रवेशाचे कारण अजित दादा तुम्हीच होतात, असे म्हटले. तर, ज्येष्ठ नेते तथा ठाकरेंच्या शिवसेनेतील बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनीही अजित दादांची उणीव शब्दात व्यक्त करता येणार नसल्याचे म्हटले.
अमोल कोल्हेंनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, आजचा दिवस खरंतर आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी अतिशय उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस, पण आज आपण आमच्यात नाहीत ही जाणीवच अस्वस्थ करुन टाकते. दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्याच्या दिवशी आज आपल्याला आदरांजली वहावी लागतेय ही भावना वेदनादायी आहे. दादा आपले शिस्तप्रियता, विकासाभिमुख दृष्टिकोन, वक्तशीरपणा आणि आपल्या माणसांबद्दल असलेला आपलेपणा हे स्वभावगुण कायमच मनाला भावले. खरंतर आपल्यामुळेच मी राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले, अशी आठवण देखील कोल्हेंनी सांगितली. महाराष्ट्रातील माझ्या सर्वात प्रिय नेत्यांपैकी आपण आहात. दरवर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अत्यंत आपुलकीचा संवाद व्हायचा, आपलं भरभरून प्रेम मिळायचं. यावर्षी त्या संवादाची, त्या प्रेमाची उणीव प्रकर्षाने भासतेय, अशी पोस्ट खासदार कोल्हे यांनी व्यक्त केली.
दिलीप सोपल यांची भावनिक पोस्ट
अजित पवारांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना भावूक झालेले बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनीही अजित पवारांच्या जयतीनिमित्त त्यांची आठवणी जागवली. दादा, तुमची उणीव शब्दांत व्यक्त करता येणार नाही, असे सोपल यांनी सोशल मीडियातून म्हटलं आहे. तर, यापूर्वी अजित पवारांचा उल्लेख करताना सोपल यांनी अजित दादा म्हणजे वेगळं रसायन असल्याचं म्हटलं होतं. अजित दादा म्हणजे, रंगूनी साऱ्या रंगात रंग माझा वेगळा, गुंतूनी साऱ्या गुंत्यात पाय माझा मोकळा.. असं अजब रसायन असल्याचे सांगत आमदार सोपल यांनी दादांची राजकीय उंची व्यक्त केली होती.
हेही वाचा
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर