Weekly Horoscope 29 June To 5 July 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै (July 2026) महिन्याचा सुरूवातीचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास साप्ताहिक राशीभविष्य (Aries Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) : प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील. अविवाहितांना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. संवादात प्रामाणिकपणा ठेवा.
आर्थिक स्थिती (Wealth) : आर्थिक बाबतीत तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा
करिअर (Career) : करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठांकडून कौतुक होईल. नोकरी बदलाचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात.
आरोग्य (Health) : आरोग्याच्या बाबतीत सांगायचं तर, मेष राशीच्या लोकांची ऊर्जा चांगली राहील. मात्र उष्णतेमुळे डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. पुरेसे पाणी प्या.
वृषभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Taurus Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) : तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. नात्यात विश्वास वाढेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. विवाह इच्छुकांसाठी सकारात्मक बातमी मिळू शकते.
करिअर (Career) : करिअरच्या बाबतीत अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. व्यवसायात नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) : जुलैच्या या आठवड्यात आर्थिक स्थिती मजबूत राहील. मालमत्ता किंवा वाहनासंबंधी निर्णय घेण्यासाठी काळ अनुकूल आहे.
आरोग्य (Health) : आरोग्याच्या बाबतीत नवीन आठवडा तुमच्या पचनासंबंधी किरकोळ त्रास होऊ शकतो. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम फायदेशीर ठरेल.
हेही वाचा
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! जुलैचा पहिलाच आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!