Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जूनचा शेवटचा आठवडा गेमचेंजर; 5 राशींना श्रीमंतीचे योग, साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 22 To 28 June 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून (June 2026) महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. 22 ते 28 जून असा या आठवड्याचा कालावधी असणार आहे. त्यामुळे हा आठवडा आपल्यासाठी नेमका कसा असणार आहे. ग्रहांच्या संक्रमणाचा आपल्यावर कसा परिणाम होणार आहे. या बाबतीत प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यानुसार, या ठिकाणी आपण मेष ते कन्या राशींच्या लोकांचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेणार आहोत. 

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी 22 ते 28 जून पर्यंतचा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. या कालावधीत तुमचा आत्मविश्वास वाढेल. महिना अखेर असल्यामुळे पैशांची सेविंग कराल. तसेच, कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. अनावश्यक खर्च टाळाल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीसाठी जूनचा शेवटचा आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक तंगी भासू शकते. तसेच, परदेशातील व्यवसायिकांकडून तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करु नका. प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या कालावधीत कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. तुमच्या कामाने तुमचा बॉस आधी प्रभावित असेल. तसेच, काही नवीन संपर्क निर्माण होतील. उत्पन्नाची अनेक साधनं निर्माण होतील. मात्र, या कालावधीत तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा सर्व कामावर पाणी पडण्याची शक्यता आहे. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीसाठी 22 ते 28 जून पर्यंतचा कालावधीत प्रभावाली असणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. घरात आनंदी वातावरण असेल. तसेच, महत्त्वाच्या कामांना तुम्ही आधी प्रोत्साहन द्याल. नवीन वस्तूंची खरेदी कराल. मात्र, पैशांचा वापरही जपून कराल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी जूनचा शेवटचा आठवडा सामान्य असणार आहे. या कालावधीत तुम्हाला ना लाभ ना तोटा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस जपून वागा. तुमच्या हातून कोणती चूक घडणार नाही याची काळजी घ्या. तसेच, समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळू शकतो. नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. मित्रांचा सहभाग महत्त्वाचा ठरेल. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रसन्न वातावरण पाहायला मिळेल. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली वाढ झालेली दिसेल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. ग्रहांच्या संक्रमणाचा शुभ परिणाम होणार आहे. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 19 June 2026 : आज शुक्रवारचा दिवस 8 राशींसाठी संकटाचा, तर, 4 राशी असतील निवांत, वेळोवेळी लागणार संकटाची चाहूल, आजचे राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *