शिवसेनेच्या मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; दरवाजातच कार्यकर्त्यांना अडवले! नेमकं काय घडलं? | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचा 60 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. मात्र मेळाव्यातून एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Eknath Shinde-
Eknath Shinde-

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून तब्बल चार वर्षानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला पक्षाचा व्हीप धुडकावून 6 खासदार अनुपस्थित राहिले. हे तेच 6 खासदार आहेत जे बंडखोरी करून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले असून ते आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित झालं आहे. राज्यातील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, 19 जून रोजी दोन्ही शिवसेनेकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचा 60 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. मात्र मेळाव्यातून एक मोठी अपडेट समोर आली आहे.

दरम्यान, गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचा 60 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी अत्यंत भव्य स्वरूपाची तयारी झाली असून कार्यकर्ते मेळाव्याला येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणेसह इतर शहरांमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. दरम्यान मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे. शिवसेनेच्या मेळाव्यात काळ्या रंगाला बंदी घालण्यात आली आहे.

काळ्या रंगाला घातली बंदी

राजकीय मेळाव्यांमध्ये काळ्या रंगाला बंदी घालण्यामागचे सर्वात मुख्य कारण म्हणजे निषेध किंवा आंदोलन टाळणे. लोकशाहीत काळा रंग हा निषेधाचे प्रतीक मानला जातो. विरोधक किंवा नाराज गट मेळाव्यात घुसून काळे कपडे उंचावून घोषणाबाजी करणे किंवा मुख्य नेत्यांचे भाषण सुरू असताना काळा रुमाल दाखवून गोंधळ घालण्याची शक्यता असते. हा संभाव्य गोंधळ आणि पक्षाची होणारी नाचक्की टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणा आणि आयोजक आधीच खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे सभागृहाबाहेर तपासणी करतानाच काळे कपडे घालणाऱ्यांना अडवले जात आहे.

ठाकरेंचा षण्मुखानंद सभागृहात होणार मेळावा

तर दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सायन येथील षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमासाठीही पक्षाकडून जोरदार तयारी सुरू असून, मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन्ही गटांकडून वर्धापन दिनाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या कार्यक्रमांकडे लागले आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांच्या नेत्यांची भाषणे आणि भूमिका महत्त्वाची ठरणार आहेत. विशेष म्हणजे पक्षातील बंडखोरीमुळे शिवसेनेच्या मंचावरून नेमकं काय बोललं जातंय हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *