Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 20 To 26 July 2026: आजपासून जुलै (July 2026) महिन्याचा नवा आठवडा सुरू झाला आहे, ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर हा आठवडा अनेकांचे नशीब पालटणारा ठरणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल. या आठवड्यात आषाढी एकादशीचा देखील सण येत आहे. त्यामुळे हा आठवडा कोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज आपण मेष ते कन्या अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा धावपळीचा असला तरी समाधान देणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये जोडीदारासोबत गैरसमज टाळा आणि संवाद वाढवा. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न चांगले राहील, मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या बाबतीत झोप आणि आहाराकडे विशेष लक्ष द्या. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलैचा चौथा आठवडा प्रगतीचा ठरेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा करार मिळू शकतो. प्रेमजीवनात आनंदाचे वातावरण राहील. विवाहितांनी एकमेकांना अधिक वेळ द्यावा. पैशांची आवक वाढेल, पण गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आरोग्य चांगले राहील, मात्र पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी नवीन आठवड्यात संयम बाळगणे आवश्यक आहे. करिअरमध्ये अचानक बदल किंवा नवीन संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा ठेवणे महत्त्वाचे ठरेल. आर्थिक व्यवहारात घाई करू नका. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीसाठी 20 ते 26 जुलै हा आठवडा उत्साहवर्धक ठरेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि जुने पैसे परत मिळू शकतात. आरोग्य उत्तम राहील, पण पावसाळ्यातील संसर्गापासून सावध राहा. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी जुलैचा चौथा आठवड्यात मेहनतीचे चांगले फळ मिळेल. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन योजना फायदेशीर ठरतील. प्रेमजीवनात जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आर्थिकदृष्ट्या लाभाचे योग आहेत. आरोग्य चांगले राहील, पण डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीसाठी नवीन आठवडा मिश्र स्वरूपाचा राहील. कामात अडथळे आले तरी शेवटी यश मिळेल. सहकाऱ्यांशी वाद टाळा. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक निर्णय घेऊ नका. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आरोग्याच्या बाबतीत पाठदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. 

हेही वाचा :

Nag Panchami 2026: नागपंचमीला तव्यावर पोळी, भाकरी का भाजली जात नाही? आजही अनेक ठिकाणी परंपरा, धार्मिक श्रद्धा, लोककथा जाणून थक्क व्हाल..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *