Weekly Horoscope : कुंभ, मीन राशींना नव्या जबाबदाऱ्या मिळणार! उद्यापासून सुरू होणारा जूनचा नवा आठवडा कसा असेल? प्रेम, नोकरी, साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 8 To 14 June 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जून महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. 8 ते 14 जून 2026 हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कुंभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) – प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक ऊर्जा राहील. जोडीदारासोबत भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकते. अविवाहित व्यक्तींना मित्रपरिवारातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी खास व्यक्ती भेटू शकते. नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल.

करिअर (Career) – करिअरच्या बाबतीत नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कल्पना आणि नियोजन कौशल्यामुळे वरिष्ठ प्रभावित होतील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा भागीदारीची संधी मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

आर्थिक स्थिती (Wealth) – आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जुनी गुंतवणूक लाभ देऊ शकते. मात्र ऑनलाइन व्यवहार आणि कागदपत्रांबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.

आरोग्य (Health) – नवीन आठवड्यात आरोग्य सामान्यतः चांगले राहील. मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे झोपेची कमतरता जाणवू शकते. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार फायदेशीर ठरेल.

मीन रास साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) – या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. विवाहित व्यक्तींना कौटुंबिक आनंदाचे क्षण अनुभवता येतील. अविवाहितांसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

करिअर (Career) – या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात विस्ताराचे नियोजन करू शकता. मात्र कोणत्याही नवीन करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक तपासा.

आर्थिक स्थिती (Wealth) – आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, या आठवड्यात आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. बचत वाढवण्यावर भर द्या. अनावश्यक खर्च टाळल्यास भविष्यासाठी चांगला निधी तयार होऊ शकतो. 

आरोग्य (Health) – आठवड्यात मानसिक शांतता राखणे महत्त्वाचे ठरेल. ध्यान, योग किंवा आध्यात्मिक उपक्रमांमुळे तणाव कमी होईल. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो.

हेही वाचा

Numerology: संपत्ती प्रचंड, पण मानसिक शांती नाही! ‘या’ जन्मतारखेचे लोक मोठं यश मिळवूनही एकटं राहण्याची वेळ? राहूचे मोठे वर्चस्व, अंकशास्त्र…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *