तिहेरी झटका… पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर आणि सीएनच्या दरात मोठी वाढ, आता एक सिलेंडर कितीला? – Marathi News | Fuel Price Hike India: War Escalates Petrol, Diesel, LPG, CNG Costs, Squeezing Budgets


देशवासियांना तिहेरी झटकाImage Credit source: प्रातिनिधिक फोटो

Petrol, Diesel, LPG, CNG Price Hike : इराण-अमेरिका युद्धाचा झळ फक्त त्या देशांनाच नव्हे तर जगभरात जाणवत आहे. या युद्धाचे परिणाम आपल्या देशात रस्त्यांपासून ते आपल्या स्वयंपाकघरांपर्यंत जाणवत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढतच चालली आहे, त्याचबरोबर रस्ते प्रवासही महाग झाला आहे. सीएनजीमुळे जराही दिलासा मिळत नाही आणि एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किमती म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे आहे. प्रत्येक नागरिकाच्या स्वयंपाकघराचे बजेटही खालावत चालले आहे.

रशिया-युक्रेन युद्धाच्या काळातही कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत होत्या, तरीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर होत्या. चार वर्षे किमती स्थिर राहिल्यानंतर, मे 2026 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली. चार दरवाढींमध्ये, इंधन अंदाचे 7.5- रुपये प्रति लिटरने महाग झालं आहे. याव्यतिरिक्त, सीएनजी आणि एलपीजीच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे.

घरगुती एलपीजी सिलिंडरबद्दल बोलायचं झालं तर युद्धापूर्वी वर्षभराहून अधिक काळ 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत स्थिर होती. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 853 रुपयांना सहज उपलब्ध होता. सगळं ठीक चालंल होतं, मात्र फेब्रुवारीच्या अखेरीस अचानक अमेरिका-इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि युद्धाला तोंड फुटलं. जागतिक ऊर्जा संकट आणखीनच गडद झालं. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 125 डॉलरच्या वर पोहोचल्या. साधारणपणे एलपीजीचे दर अनेकदा महिन्याच्या पहिल्या तारखेला सुधारित केले जातात.

घरगुती सिलिंडरच्या दरात 89 रुपयांनी वाढ

1 मार्च रोजी दर जाहीर झाले, पण घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. युद्धामुळे, तेल मार्केंटिंग कंपन्यांनी 7 मार्च रोजी घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी नवीन दर जाहीर केले. यामुळे एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ झाली. नवीन दरवाढीनंतर दिल्लीत घरगुती सिलेंडरची किंमत 913 रुपये इतकी झाली. तर त्यानंतर बरोब्र 3 महिन्यांनी, सिलेंडरच्या किमतीत 29 रुपयांची वाढ झाली. आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत942 रुपये इतकी झाली आहे.

व्यावसायिक सिलेंडर तब्बल 1773 नी महाग

व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ग्राहकांसाठी गेले 3 महिने धक्कादायक ठरले आहेत. 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत अवघ्या तीन महिन्यांत 1740.50 वरून 3113.50 पर्यंत वाढली आहे. म्हणजेच व्यावासायिक वापरासाठीचे सिलेंडर हे 1373 रुपयांनी महाग झाला आहे. फेब्रुवारीमध्ये याच सिलेंडरची किंमत 1740. 50 रुपये इतकी होती. मात्र यानंतर मार्चमध्ये दुहेरी फटका बसला.

1 मार्च 2026 रोजी, व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 28 रुपयांची वाढ होऊन तो 1768.50 रुपये झाला. त्यानंतर 7 मार्च रोजी 114.50 रुपयांची वाढ झाल्याने दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 1883 रुपये झाली. त्यानंतर, 1 एप्रिल 2026 रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 2078.50 रुपये इतकी झाली होती.

मात्र मे महिन्यात सर्वात मोठा झटका बसला. कारण या महिन्यात दिल्लीत सिलेंडरच्या दरात 993 रुपयांची न वाढ होऊन तो 3071.50 रुपयांवर पोहोचला. एवढंच नव्हे तर 1 जून रोजी दरात आणखी 42 रुपयांची वाढ करण्यात आली, ज्यामुळे दिल्लीत 19-किलो सिलेंडरची किंमत 3,113.50 रुपये झाली.

सीएनजीची किंमत 3 वेळा वाढली

युद्धाच्या काळात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती वाढल्या आहेतच, पण सीएनजीच्या दरातही प्रचंड वाढ झाली आहे. नुकतीच शनिवारी दरात प्रति किलोग्राम 1 रुपयांची वाढ झाली असून, 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीतील ही तिसरी दरवाढ आहे.

दिल्लीत सीएनजीचा दर आता 81.09 रुपये प्रति किलो झाला आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये दर 89.70 रुपये प्रति किलो झाले आहेत, तर गुरुग्राममध्ये सीएनजीचा दर 86.12 रुपये प्रति किलो असेल. 15 मे रोजी जाहीर झालेल्या 2 रुपये प्रति किलो आणि 17 मे रोजी जाहीर झालेल्या 1 रुपये प्रति किलो दरवाढीनंतर ही दरवाढ झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *