Wardha Accident News: कपडे खरेदीसाठी निघालेल्या वानखेडे कुटुंबावर काळाचा घाला! हिंगणघाटजवळ पती, पत्नीसह 6 वर्षांच्या चिमुकलीचा अपघातात मृत्यू


Wardha Accident News: नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील हिंगणघाट (Hinganghat) नजीक आज एक भीषण अपघाताची (Accident) घटना घडली आहे. महामार्गावरील हॉटेल सगुना फॅक्टरीजवळ भरधाव येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने मोपेड दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच अंत झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या 6 वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीय.  

Wardha Accident News: सासरवाडीहून खरेदीसाठी निघाले अन् घात झाला…

गजानन वानखेडे (वय 45), पल्लवी वानखेडे (वय 38) आणि आरोही वानखेडे (वय 6) अशी अपघातातील मृत व्यक्तींची नावे आहेत. वानखेडे कुटुंब हे समुद्रपूर तालुक्यातील कुर्ला येथील रहिवासी होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गजानन वानखेडे हे आपल्या पत्नी आणि मुलीसह सासरवाडीला आले होते. तिथून ते सर्वजण मोपेड दुचाकीने कपडे खरेदी करण्यासाठी हिंगणघाट शहराकडे जात होते.

Wardha Accident News: विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाची जोरदार धडक

वानखेडे कुटुंब राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना, हॉटेल सगुना फॅक्टरीजवळ विरुद्ध दिशेने अत्यंत भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चक्काचूर झाला आणि दुचाकीवरील गजानन, पल्लवी व चिमुकली आरोही हे तिघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

Wardha Accident News: रुग्णालयात नेण्यापूर्वीच प्राण ज्योत मालवली

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ रुग्णवाहिका बोलवून तिघांनाही उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे, अपघातात दगावलेली 6 वर्षांची चिमुकली आरोही ही जुळी बहीण होती. तिच्या पश्चात तिची दुसरी जुळी बहीण बचावली आहे, मात्र आई-वडील आणि बहिणीच्या जाण्याने ती आता पोरकी झाली आहे. एका सुखी कुटुंबाचा असा अचानक अंत झाल्याने कुर्ला आणि हिंगणघाट परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Prasad Lad Meet Manoj Jarange Patil: 55 वर्षांचे प्रसाद लाड 44 वर्षांच्या मनोज जरांगेंना मोठे भाऊ, दादा-दादा म्हणत राहिले, फडणवीसांची बाजू मांडताना म्हणाले….

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *