Cockroach Janta Party on Dharmendra Pradhan: नीट घोटाळ्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या उपरोधिक (satirical) मोहिमेचे संस्थापक अभिजित दिपकेनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी याचिका सुरू केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे आणि नीट (NEET) परीक्षेतील गोंधळामुळे 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप अभिजितने केला आहे. या मोहिमेला तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
इन्स्टाग्राम अकाउंटने 2 कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला
CJP च्या इन्स्टाग्राम अकाउंटने 2 कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे, जो भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या अधिकृत हँडलपेक्षाही जास्त आहे. या मोहिमेला अखिलेश यादव, महुआ मोइत्रा आणि कीर्ती आझाद यांसारख्या प्रमुख नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.
एक्स (ट्विटर) खातं बंद करण्यात आलं
सोशल मीडियात मिळत असलेल्या अभूतपूर्व यशाने सीजेपी टीमचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र, त्यांचे एक्स (ट्विटर) खातं बंद करण्यात आलं. मात्र, त्यानंतर त्यांनी ‘Cockroach is Back’ या नावाने नवीन खाते सुरू केले, ज्याला सुद्धा काही तासांतच हजारो फॉलोअर्स मिळाले. ‘कॉकरोच जनता पार्टी’ हे नाव सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीस सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांचा उल्लेख “कॉकरोच” असा केल्यामुळे चर्चेत आले आणि त्यानंतर या उपरोधिक मोहिमेची सुरुवात झाली. या मोहिमेचा संस्थापक मराठी तरुण अभिजित दिपके आहे. तो सध्या अमेरिकेत असून बोस्टन युनिव्हर्सिटीमधून जनसंपर्क (Public Relations) विषयाचे शिक्षण पूर्ण केले आहे. भारतात परतल्यावर दिल्ली विमानतळावर आपल्याला अटक करून तिहार जेलमध्ये पाठवले जाईल, अशी भीती त्याने व्यक्त केली आहे.
आई-वडिलांना मोठी चिंता
दरम्यान, वाढलेल्या लोकप्रियतेमुळे पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेच्या आई-वडिलांना मोठी चिंता वाटत आहे. आपला मुलगा अडचणीत येऊ शकतो आणि त्याला अटकही होऊ शकते, अशी भीती त्यांना वाटत आहे.अभिजीतचे आई-वडील, भगवान आणि अनिता दीपके, छत्रपती संभाजीनगरला राहतात. दोघांनी सांगितले की, मुलाने राजकारणात यावे अशी त्यांची इच्छा नव्हती. अभिजीतच्या या निर्णयाबद्दल ऐकून आम्हाला झोप लागत नाही. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी 15 मे रोजी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान देशातील बेरोजगार तरुणांना ‘झुरळ’ म्हटले होते. 16 मे रोजी त्यांनी स्पष्टीकरण दिले की, “मी तरुणांवर टीका केली नाही. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला.”
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा