Aadinath Kothare Urmila Kanetkar Net Worth: मराठी सिनेविश्वात सध्या अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath kothare) आणि उर्मिला कानेटकर (Urmila Kanetkar) यांच्या घटस्फोटाची (Divorce) प्रचंड चर्चा होत आहे. 15 वर्षांच्या संसारानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आदिनाथ कोठारे याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार (Entertainment), गेल्या काही काळापासून दोघांच्या वैवाहिक आयुष्यात चढ उतार सुरू होते. दोघांनीही विभक्त होण्याच्या निर्णयानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान, दोघे किती कमावतात? त्यांचा नेटवर्थ किती? जाणून घेऊयात.
उर्मिला की आदिनाथ? कुणाचे नेटवर्थ जास्त? (Actor Aadinath Kothare Urmila Kanetkar Net Worth)
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर दोघेही मीडिया इंडस्ट्रीतील चर्चेत असणारं नाव. या दोघांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. आदिनाथ कोठारे हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 83, चंद्रमुखी, झपाटलेला, पाणी, इश्क वाला लव्ह यांसारख्या सिनेमात काम केलं. त्यानं लहानपणीही, ‘माझा छकुला’ या सिनेमात काम करुन प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली.
तर, उर्मिला कानेटकर हिनं देखील अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. काकण, दुनियादारी, गुरू यांसारख्या सिनेमात काम केलं. तसेच ‘तुझेच मी गीत गात आहे’, या मालिकेतही काम केलं. ती एक उत्कृष्ट कथक डान्सर देखील असल्याची माहिती आहे. दोघांच्या नेट वर्थबाबत अनेक खुलासे केले जातात. Asianet Newsच्या वृत्तानुसार, उर्मिलाचा नेटवर्थ 15 कोटी ते 20 कोटीच्या आसपास असल्याची माहिती आहे.
‘एशियानेट न्यूज’च्या वृत्तानुसार, आदिनाथ कोठारेचा नेटवर्थ जवळपास 26 कोटीच्या आसपास असल्याची माहिती आहे. ही माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार आहे. दोघांनीही आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन याची माहिती दिली. दोघांच्या नात्यात नेमकं काय बिनसलं? याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, दोघांना मिळून जिजा नावाची 8 वर्षांची मुलगी आहे. ‘जोडीदार म्हणून आम्ही आमचा प्रवास इथेच थांबवत आहोत. पण आमची मुलगी जिजासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आम्हा दोघांची सर्वस्व आहे’, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या: